मुस्लिम विकास परिषदेच्या वतीने खतना कॅम्प संपन्नएकूण 158 मुस्लिम बालकांचा समावेश

करमाळा: प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60
दरवर्षीप्रमाणे यंदाही मुस्लिम विकास परिषदेच्या वतीने मुस्लिम समाजातील लहान बालकांचे खतना कॅम्प नालबंद हॉल येथे संपन्न झाले असून यामध्ये 158 मुस्लिम बालकांची खतना स्पेशालिस्ट डॉक्टर उजेर बेग सोलापूर यांच्या हस्ते शस्त्रक्रिया करण्यात आली असल्याची माहिती मुस्लिम विकास परिषदेचे अध्यक्ष फारुक जमादार यांनी सांगितले
आज सकाळी सात वाजता मौलाना मोहसीन शेख मौलाना सिकंदर मौलाना अन्वर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रार्थना करून खतना कॅम्पला सुरुवात करण्यात आली यावेळी चांद हाजी फारुक बेग बकश भाई शेख जावेद शेख समीर सिकंदर शेख शाहरुख शेख असीम बेग समीर दाऊद शेख आयान बेग आदींच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले
यावेळी मौलाना मोहसीन म्हणाले की इस्लाम धर्मात खतनाला विशेष महत्त्व आहे मुस्लिम विकास परिषदेच्या वतीने दरवर्षी कॅम्प राबवून मुस्लिम समाजातील बालकांची एक उत्तम सोय केली जात असून यामध्ये प्रचंड प्रमाणात पैशाची बचत करण्यात येते असे दरवर्षी कॅम्प राबवून मुस्लिम समाजातील बालकांची सोय करण्यात यावी असे आव्हान त्यांनी यावेळी केले
या खतना कॅम्पला मुस्लिम समाजाचे अध्यक्ष हाजी उस्मान शेठ तांबोळी सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक सेलचे माजी जिल्हाध्यक्ष एडवोकेट वजीर शेख सावंत गटाचे नेते सुनील बापू सावंत नगरसेवक हाजी अल्ताफ शेख तांबोळी नगरसेवक संजय सावंत एडवोकेट नईम काजी जेष्ठ पत्रकार अशोक नरसाळे नासीर कबीर अशपाक सय्यद सुरज शेख मुस्तकीन पठाण आदींनी कॅम्प ला भेट दिली
सदर खतना कॅम्प यशस्वी करण्यासाठी समद दाळवाले युवा नेते अरबाज बेग, फिरोज बेग, तौफिक शेख,जमीर मुलाणी हाजी हमीद सय्यद, इरफान मिर्झा पप्पू पठाण आफताब पठाण,शाहीद बेग,नदीम शेख,नवाज बेग,साहील शेख,अमन शेख, इम्तियाज पठाण आदींनी विशेष परिश्रम घेतले



