Uncategorized

बोईसर मान ग्रामपंचायत सदस्य व खाजगी इसम पालघर पोलीस उपअधीक्षक नवनाथ जगताप यांच्या जाळ्यात अटक

पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक. 7030516640. पालघर जिल्हा वृत्तांत

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्याकडून परवाना मिळण्याकरिता बोईसर मान ग्रामपंचायतीचा दाखला दिल्याचा मोबदला म्हणून तक्रारदार यांच्या ओळखीच्या दोन इसमांकडून 50 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून 25 हजार रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी बोईसर मान ग्रामपंचायत सदस्य अजय शिणवार आणि विक्रांत चुरी या खाजगी इसमाला अँटी करप्शन ब्युरो पालघर युनिट पोलीस उपअधीक्षक नवनाथ जगताप यांच्या टीमने बुधवारी अटक करून बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत.
(56) वर्षीय तक्रारदार यांच्या ओळखीच्या दोन इसमांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्याकडून परवाना हवा होता. याकरिता बोईसर मान ग्रामपंचायतीच्या दाखल्याची आवश्यकता होती. हा दाखला या ग्रामपंचायतीचे सदस्य अजय सुरेश शिणवार वय वर्ष (27)आणि खाजगी इसम विक्रांत राजेंद्र चुरी वय वर्ष (29)धंदा चालक राहणार वारंगडे आठलेपाडा बेटेगाव बोईसर यांनी देण्यासाठी एका ग्रामपंचायत दाखल्यासाठी 25 हजार रुपये असे दोन दाखल्यांसाठी 50 हजार रुपये लागतील अशा लाचेची मागणी केली यावरून तक्रारदार यांनी या ग्रामपंचायत सदस्याची व खाजगी इसमाची तक्रार मंगळवार दिनांक 7 फेब्रुवारी 2023 रोजी अँटी करप्शन ब्युरो पालघर कार्यालयात केल्यावर श्री.सुनील लोखंडे पोलीस अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो विभाग ठाणे परिक्षेत्र व श्री.अनिल घेरडीकर अप्पर पोलीस अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो ठाणे विभाग परिक्षेत्र यांच्या मार्गदर्शनाखाली अँटी करप्शन ब्युरो पालघर विभागाचे पोलीस उपअधीक्षक नवनाथ जगताप सह पोलीस निरीक्षक स्वपन बिश्वास,पोलीस हवालदार अमित चव्हाण,विलास भोये,अजय सुतार,निशा मांजरेकर,दीपक सुमडा,योगेश धारणे,पोलीस नाईक सखाराम दोडे,स्वाती तारवी या टीमने सापळा रचून बुधवार दिनांक 8 फेब्रुवारी 2023 रोजी दुपारी सव्वा एक वाजता बोईसर मान ग्रामपंचायत कार्यालय सदस्य अजय शिणवार यांच्या बियर शॉप जवळ अजय शिणवार याला तक्रारदार यांच्या ओळखीच्या इसमा कडून 25 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक करून ही लाच देण्यासाठी प्रवृत्त करणारा खाजगी इसम विक्रांत चुरी याला देखील अटक करून या दोघांवर बाईसर पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button