शहर

माळशिरस तालुका आय काँग्रेसच्या अध्यक्षपदी अकलूजचे गिरीश शेटे यांची निवड…

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क 1

अकलूज येथील गिरीश प्रभाकर शेटे यांची काँग्रेस (आय) पक्षाच्या माळशिरस तालुका अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली असून तसे पत्र प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात त्यांना देण्यात आले…

मुंबई येथे झालेल्या एका बैठकीमध्ये निवड समिती समोर ब्लॉक अध्यक्षांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या.या निवड समितीने सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील माळशिरस ब्लॉकच्या ब्लॉक अध्यक्षपदी गिरीश शेटे यांची एकमताने निवड केली…

माळशिरस तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे आजी माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याशी समन्वय साधून लवकरच माळशिरस तालुक्याची कार्यकारणी निश्चित केली जाईल,असे वक्तव्य नूतन अध्यक्ष गिरीश शेटे यांनी व्यक्त केले…

पुढे बोलताना ते असे हि म्हणाले की,त्यासाठी पक्ष कार्यकर्त्यांची बैठक लावण्यात येईल.बैठकीमध्ये इच्छुक पदाधिकाऱ्यांच्या इच्छा जाणून घेऊन विचार विनिमय करून पक्ष वाढी साठी केलेले योगदान लक्षात घेऊन पदाधिकारी निवडण्यात येतील असे याप्रसंगी नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष गिरीश शेटे यांनी टाइम्स 9 न्यूज ने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले…

शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटना महासंघ आणि राष्ट्रीय पिछडा वर्ग अनुसूचित जाती जनजाती एवं अल्पसंख्यांक महासंघ नवी दिल्ली अर्थात एन.यु.बी.सी.महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष,प्रदेश संपर्क व प्रसिद्धी प्रमुख यांनी नूतन तालुका अध्यक्ष गिरीश शेटे यांचे विशेष अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या…

  1. ↩︎

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button