जिल्हा परिषद हिसरे शाळेचे मुख्याध्यापक मन्नान मोमीन आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मानित, जिल्हा परिषद परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी केला करमाळ्यात सन्मान.

करमाळा प्रतिनिधी आलिम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिसरे या शाळेचे मुख्याध्यापक श्री मन्नान दगडू मोमीन यांना पंचायत समिती शिक्षण विभाग करमाळा यांच्यातर्फे आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी जिल्हा शिक्षण अधिकारी प्राथमिक श्री. कादर शेख साहेब तसेच करमाळा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी मनोज राऊत साहेब गटशिक्षणाधिकारी राजकुमार पाटील साहेब हे उपस्थित होते,

श्री मोमीन सर यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिसरे या ठिकाणी सायन्स वॉल, आदर्श परसबाग, डिजिटल वर्ग शाळा, वृक्षारोपण मुख्यमंत्री स्वच्छ शाळा सुंदर शाळा ,असे अनेक उपक्रम राबवून उत्कृष्ट अशी आपली शाळा बनवलेले आहे त्याचेच फळ म्हणून त्यांना आदर्श पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेले आहे तरी त्यांचे सर्व ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समिती यांच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या..



