महाराष्ट्र
अकलूज च्या दर्गाह मस्जिद तर्फे “इफ्तार पार्टी” चे आयोजन…
टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क
दिनांक 01/04/2024 सोमवार संध्याकाळी ठीक 6 वाजता दर्गाह मस्जिद अकलूज विजय चौक इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे,
सदर इफ्तार पार्टी साठी राज्याचे मा.उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील,माळशिरस तालुक्याचे “कारभारी” जयसिंह मोहिते पाटील,युवा नेते धैर्यशील मोहिते पाटील,मा.सरपंच संग्रामसिंह मोहिते पाटील आणि मा.सरपंच किशोरसिंह माने पाटील उपस्थित राहणार असुन
यावेळी अकलूज पंचक्रोशितील समस्त हिंदु आणि मुस्लीम बांधवांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित रहावे,असे आवाहन अकलूज शहर मुस्लीम समाजाचे नेते ऍड.वजीर शेख यांनी आणि दर्गाह मस्जिद ट्रस्ट विजय चौक अकलूज यांनी केले,ते टाईम्स 9 न्यूज नेटवर्क चे संपादक नौशाद मुलाणी यांच्याशी भ्रमणध्वनी वरून बोलत होते…