महाराष्ट्र

संग्रामसिंह मोहिते पाटील यांच्या “झंझावाती” अकलूज दौऱ्यात जनतेने दिला कौल.भाजपा ला धडा शिकवण्यासाठी “तुतारी” वाजवणे गरजेची…

आमीर मोहोळकर
प्रतिनिधि,टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क,अकलूज

माढा लोकसभा मतदार संघातील जनभावनेचा “कानोसा” घेण्यासाठी आपल्या हक्काच्या अकलूज शहराचा “जायजा” युवा नेते संग्रामसिंह मोहिते पाटील यांनी घेतला,यावेळी बहुतांश जनतेने या निवडणुकीत भाजपा ला धडा शिकवण्यासाठी “तुतारी” फुंकणे हे गरजेचे असल्याचे मत मांडले…

आज दिवसभर अकलूज च्या काही भागात नागरिकांनी संग्रामसिंह मोहिते पाटील यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले,आपल्या “हक्काचा माणूस” धैर्यशील मोहिते पाटील यांच्या उमेदवारीला जनतेतून मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहता संग्रामसिंह मोहिते पाटील यांचा सुध्दा आनंद द्विगुणित झाल्यामुळे अकलूज ची तमाम जनता हि तुतारी कधी वाजवायची…?असा प्रश्न करीत होते…

संग्रामसिंह मोहिते पाटील हे गणेशनगर येथे आल्या नंतर “वंदे मातरम्” गणेशोत्सव मंडळाच्या छोट्या कार्यकर्त्यांनी एक छोटीसी “तुतारी” हि त्यांना भेट दिली,यावेळी अकलूज शहरातील बहुसंख्य मोहिते पाटील समर्थक उपस्थित होते…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button