महाळुंग श्रीपूर नगरपंचायतपालखी सोहळा आगमनपूर्वी स्वछता साफसफाई करणार आहे कीं नाही

बी.टी.शिवशरण
जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा रविवारी २५जून रोजी महाळुंग श्रीपूर येथे येत आहे पालखी सोहळा चार दिवसावर येऊन ठेपला आहे तरी या भागातील स्वछता साफसफाई अद्याप झालेली दिसत नाही कचरा गाड्या जरी असल्या तरी त्या घरोघर जाऊन एक दिवसाचा घरातील कचरा नेला जातो मात्र रस्त्यावर रस्त्याच्या बाजूला असलेले कचऱ्याचे ढीग तसेच आहेत या भागातील गटारी तुंबलेल्या अवस्थेत पहायला मिळतात नगरपंचायत कडून जीं काम होणं अपेक्षित व जरुरीची आहेत ती वेळेवर होणं गरजेचे आहे निर्जंतुक पावडर डास फवारणी झाली पाहिजे
या बाबतीत नगरपंचायत ची यंत्रणा सतर्क राहिली पाहिजे शेजारील शहरात गावात त्यांची यंत्रणा कामाला लागल्याच्या बातम्या माध्यमाद्वारे ऐकायला पहायला मिळत आहेत या भागात रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत रस्ता दुरुस्ती डागडुजी झालेली नाही पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे मोटार दुरुस्ती नसल्याचे सांगण्यात येते ती पालखी सोहळा येण्यापूर्वी तरी दुरुस्त होऊन पाणी पुरवठा व्यवस्थित व्हावा अशी नागरिकांतून मागणी होत आहे



