महाराष्ट्र

“अजातशत्रू” विजयसिंह मोहिते पाटील यांच्या सहस्त्र चंद्र दर्शनाच्या निमित्ताने टेंभूर्णी येथील “गोविंद वृद्धाश्रम” येथे मिष्टान्न भोजन कार्यक्रम…

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क

महाराष्ट्राच्या राजकारणातील ऋषीतुल्य नेतृत्व,सहकार क्षेत्रातील “पितामह”, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील यांच्या 81 व्या वाढ दिवसा निमित्त म्हणजेच सहस्त्र चंद्र दर्शनाच्या निमित्ताने आपल्या माढा तालुक्यातील टेंभूर्णी येथे असलेल्या “गोविंद वृद्धाश्रम” येथे मिष्टान्न भोजन कार्यक्रम 12 जून 2025 रोजी सायंकाळी 7 वाजता आयोजित केला असल्याची टाइम्स 9 च्या सुत्रांनी दिली…

सदर कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शप) अल्पसंख्यांक विभागाने केल्याची माहिती ॲड वजीर शेख यांनी दिली,पुढे बोलताना ते असे हि म्हणाले की,सदरच्या कार्यक्रमा प्रसंगी पक्षाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले…

या वेळी अकलूज ग्रामपंचायत चे माजी सदस्य दादाभाई तांबोळी,जावेद बागवान ( मेंबर),जावेद बाबा तांबोळी, अस्लम सय्यद, युवक मित्र जुल्करभाई शेख,मोहिते पाटील गटाचे कट्टर समर्थक आमीर मोहोळकर यांच्या सह बहुसंख्य अल्पसंख्यांक बांधव उपस्थित होते…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button