विशेष

विठ्ठलवाडीचे राजेंद्र गुंड यांची शिक्षक संघाच्या तालुकाध्यक्ष पदी नियुक्ती

करमाळा प्रतिनिधी –

अलीम शेख

मोबाईल नंबर 98 50 68 63 60

विठ्ठलवाडीचे आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड यांची अखिल भारतीय मराठा महासंघ सोलापूर यांच्या शिक्षक संघाच्या माढा तालुकाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आल्याचे पत्र अखिल

भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष संदीप भोरे व सचिव गणेश चव्हाण यांच्या हस्ते कुर्डूवाडी येथे समारंभपूर्वक देण्यात आले.यावेळी जिल्हाध्यक्ष संदीप भोरे यांनी सांगितले की,आपल्या समाजाचे अनेक प्रश्न व समस्या शासन दरबारी प्रलंबित आहेत. ते सोडविण्यासाठी मराठा समाजाची वज्रमूठ होणे आवश्यक आहे.संघर्ष योद्धा मनोज जरांगे-पाटील यांनी हाती घेतलेली मोहिम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी त्यांना मनापासून साथ द्यावी असे आवाहन केले.निवडीनंतर नूतन तालुकाध्यक्ष राजेंद्र गुंड यांनी सांगितले की, मराठा महासंघाची भूमिका तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार आहे.समाजातील गोरगरीब व गरजू लोकांचे प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी वरिष्ठांकडे पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.यावेळी डॉ.जयंत करंदीकर, तालुकाध्यक्ष धनाजी गोडसे, अरविंद पवार,सूरज गव्हाणे, विजयकुमार आडकर,शंकर बागल,देवीदास सुरवसे,धर्मराज भोरे,सचिन बागल,अनंतराज पातूरकर,हरिदास बागल, मुनीराज भोरे,बालाजी बागल,दिपक शिंदे,शिवाजी भोरे,विवेक मराळ,अशोक भोरे, नितीन कुंभार,डॉ.तृप्ती भोरे,ज्योती भोरे,सीमा भोरे,तृप्ती आडकर,शैला भोरे, श्रृती भोरे, शंकर कदम, बंडू काळे, काका चव्हाण, वैभव देशमुख, सुनील पारखे, राहूल शिंदे, मधूकर भोरे, जयंत भोरे यांच्यासह मराठा महासंघाचे सदस्य व महिला उपस्थित होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
20:13