महाराष्ट्र

वेळापूर येथे “लोकनेते” राजाभाऊ सरवदे यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटप…

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क

वेळापूर (ता. माळशिरस) : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत शालेय साहित्य वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला.या उपक्रमाअंतर्गत वेळापूर येथील जिल्हा परिषद मुलींच्या शाळेत विद्यार्थिनींना वही,पेन आदी शालेय साहित्यांसह खाऊचे वाटप करण्यात आले…

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वेळापूर गावचे सरपंच रजनीश बनसोडे होते.प्रमुख पाहुणे म्हणून वेळापूर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी,महादेव देवालय ट्रस्ट अध्यक्ष अमृतराज माने देशमुख,युवक आघाडी राज्य उपाध्यक्ष किरण धाईंजे,पश्चिम महाराष्ट्र संघटक एस. एम. गायकवाड,जिल्हा उपाध्यक्ष शामराव भोसले,जिल्हा सचिव भारत आठवले,माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब धाईंजे,ज्येष्ठ मार्गदर्शक शिवाजी बनसोडे,तालुका सरचिटणीस मारुती खांडेकर,युवक तालुका अध्यक्ष दशरथ नवगिरे,तालुका मार्गदर्शक भास्कर बनसोडे,युवक सरचिटणीस प्रवीण साळवे,संपर्कप्रमुख अण्णासाहेब भोसले,ग्रामपंचायत सदस्य हनुमंत वायदंडे,पत्रकार तुषार केंगार व मुख्याध्यापक इनुस मुलाणी आदी मान्यवर उपस्थित होते…

यावेळी तालुका सचिव दादासो सरतापे,शाळा व्यवस्थापन अध्यक्ष रणजीत सरवदे,श्रीपूर अध्यक्ष गणेश सावंत,विझोरी अध्यक्ष गौतम वाघंबरे,राजकुमार बनसोडे,प्रदीप सरवदे,अजय बनसोडे,वेळापूर युवक शहराध्यक्ष स्वप्निल सरवदे,संतोष बनसोडे,सतीश गायकवाड,संतोष जाधव,अतिश आठवले तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते…

कार्यक्रमाचे आयोजन रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तालुका अध्यक्ष मिलिंद सरतापे यांनी केले होते…

मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप करून राजाभाऊ सरवदे यांच्या सामाजिक कार्याची परंपरा पुढे नेण्याचा संकल्प करण्यात आला.या उपक्रमामुळे विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावर आनंद फुलला.सामाजिक बांधिलकी जोपासत लोकनेते राजाभाऊ सरवदे यांच्या वाढदिवसानिमित्त घेतलेला हा उपक्रम गावकऱ्यांच्या व कार्यकर्त्यांच्या मनात आदर्श ठरला आहे…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button