महाराष्ट्र

“तुतारी” फुंकत धैर्यशिल मोहिते पाटील करणार उद्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)गटामध्ये प्रवेश…?

आमीर मोहोळकर
प्रतिनिधि,टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क,अकलूज
मो. नंबर.9890299499

फलटण च्या रणजितसिंह निंबाळकर यांना भाजपा ने दिलेली उमेदवारी अन् नाराज झालेले मतदार आणि कार्यकर्त्यांनी काबीज केलेली हि निवडणूक,याच अनुषंगाने काल दिवसभर अकलूज च्या “शिवरत्न” वर झालेली खलबते पाहता उद्या कुठ्ल्याही क्षणी धैर्यशिल मोहिते पाटील यांचा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गटामध्ये प्रवेश होऊ शकतो,अशी माहिती टाइम्स 9 न्यूज नेटवर्क ला सुत्रांनी दिली…

शेकाप चे भाई जयंत पाटील,फलटण चे आमदार दिपक चव्हाण,मा रामराजे,रघुनाथ राजे,जेऊर (करमाळा) चे नारायण आबा पाटील,टेंभुर्णी चे संजय कोकाटे आणि माढा लोकसभा मतदार संघातून नाराज होऊन आलेले अनेक नेते मंडळी,कार्यकर्ते यांनी काल दिवसभर अकलूज च्या शिवरत्न वर ठीया मांडले नंतर उद्या कसल्याही परिस्थितीत शरद पवारांच्या पक्षामध्ये जाहीर प्रवेश करून लोकसभेचे उमेदवारी मिळवण्याचा घाट मोहिते पाटील यांच्या अनेक कार्यकर्त्यांनी बोलून दाखविला…

भाजपा चे संकटमोचक गिरीश महाजन यांची झालेली दमछाक पाहता ते हि आता माढा लोकसभा मतदार संघासह पश्चिम महाराष्ट्रातल्या बारामती,सांगली, सातारा,सोलापूर येथील जनतेच्या अपेक्षा भाजपा कसा पुर्ण करणार या कडे सर्वांचे लक्ष लागले असुन, त्यामुळे उद्या कसल्याही परिस्थितीत धैर्यशिल मोहिते पाटील यांनी “तुतारी” वाजवत जनतेच्या अपेक्षा उंचवाव्या अशी कुजबूज माढा लोकसभा मतदार संघात सुरू झाल्या आहेत अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button