शिवरत्न ने जपली सामाजिक बांधिलकी…

आमीर मोहोळकर
प्रतिनिधि,टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क,अकलूज
9890299499
आज अकलूज येथील शिवरत्न बंगला येथे माढा लोकसभा मतदार संघा बाबत अनेक घडामोडी घडत असताना आणि संकटमोचक गिरीश महाजन यांच्या सह बातचीत चालू असताना रमजान महिन्याचा रोजा सोडण्याची वेळ झाली आहे हे लक्षात आले नंतर एक सामाजिक बांधीलकी जोपासत मा सौ नंदिनीदेवी विजयसिंह मोहिते पाटील यांनी मुस्लिम समाजातील कार्यकर्त्या साठी “इफ्तार” ची सोय शिवरत्न बंगल्या मध्ये केली…

यावेळी मा आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांच्या सुविद्य पत्नी मा सौ वहिनी साहेब,शितलदेवी मोहिते पाटील,विश्वतेजसिंह मोहिते पाटील (विशु बाबा),कु राजकुंवर (अक्का साहेब) धैर्यशिल मोहीते पाटील यांनी इफ्तार साठी आलेल्या मुस्लिम समाजातील कार्यकर्त्यांना खजुर,फळे,थंडगार सरबत आणि पाणी वाटप केले…

इफ्तार करते वेळी मा श्री विजयसिंह मोहिते पाटील यांना दीर्घआयुष्य लाभो आणि युवा नेते धैर्यशिल मोहिते पाटील यांना त्यांच्या माढा लोकसभा निवडणुकीत यश मिळो,अशी दुआ करण्यात आली…

यावेळी कुर्डुवाडी येथील मोहिते पाटील गटाच्या कट्टर समर्थक अनिसा (निलू) शेख,हाजी जमीर चौधरी,आमीर मोहोळकर, भैय्या माढेकर,राजू मोतीलाल (MM),तनविर तांबोळी,जुबेर बागवान,एजाज बागवान,मुन्ना चौधरी,नाझिम खान,रफिक पठाण यांच्या सह बहुसंख्य मुस्लीम बांधव उपस्थित होते…









