पोलीस उपअधिक्षक महंमदरफी खान यांचे हृदयविकाराने निधन

उपसंपादक—–हुसेन मुलाणी
टाइम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
मो. 9730 867 448
महाराष्ट्र शासनाने कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून पोलीसपदक देवुन गौरवविलेले लोहगाव पुणे येथील महाराष्ट्र पोलीस मेगासीटीचे मूळ संस्थापक पोलीस उपअधिक्षक महंमदरफी चांदसाहेब खान (वय 65 वर्षे) यांचे पुण्यात हृदयविकाराने दुःख निधन झाले. चार दिवसांपूर्वी फातिमानगर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी त्यांना दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, चार बहिणी आणि एक भाऊ असा परिवार आहे.
राज्याच्या पोलीस दलात त्यांनी औरंगाबाद, पुणे आदि शहरात पोलीस निरीक्षक , पोलीसउपअधिक्षक म्हणून 36 वर्षे सेवा केली. दरम्यान, पोलिसांना हक्काची घरे मिळावीत म्हणून त्यांनी लोहगाव पुणे येथे पोलीसांसाठी मेगासीटी सहकारी गृहनिर्माण संस्थेची स्थापना केली. औरंगाबाद, लातूर, नांदेड आणि पुणे लोहगाव येथे त्यांनी पोलीस, गृह आणि न्यायालयीन विभागातील आजी माजी कर्मचाऱ्यांसाठी गृहप्रकल्पांची उभारणी केली. ते अत्यंत मनमिळावु , निस्वार्थी स्वभावाचे होते. त्यांचे प्राथमिक ,माध्यमिक उच्च शिक्षण अकलूज येथेच झालेले होते.
पुणे येरवडा येथील कब्रस्तान मध्ये त्यांच्यावर दफनसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलीस खात्यातील आजी माजी वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी आणि विविध क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती. अचानक त्यांच्या निधनाने सर्वच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.



