शहर

छत्रपती संभाजी नगर उप जिल्हाधिकारी विनोद खिरोळकर एसीबीच्या जाळ्यात अटक

टाईम्स 9मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640

छत्रपती संभाजी नगर निवासी उपजिल्हाधिकारी यांना लाच घेतल्याप्रकरणी अँटी करप्शन विभाग यांनी अटक करून त्यांच्या विरुद्ध मंगळवारी गुन्हा दाखल करून त्यांच्याकडून 67 लाख रुपयांचा एकूण ऐवज जप्त केला आहे.

विनोद खिरोळकर असे या लाच खोर उपजिल्हाधिकाऱ्याचे नाव असून ते छत्रपती संभाजी नगर येथील निवासी उपजिल्हाधिकारी आहेत.
शेत शेतजमीनचा वारस भोगवटदार 2 चा 1 करून देण्यासाठी निवासी उप जिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांनी 41 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

यापैकी 23 लाख रुपयांची रक्कम त्यांनी याआधी स्वीकारली होती. यानंतर त्यांनी पुन्हा तक्रारदार यांच्याकडे उर्वरित 18 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. व यातील पाच लाख रुपयांची लाच त्यांच्या सांगण्यावरून स्वीकारताना त्यांच्या सहाय्यकाला अँटी करप्शन विभागाने अटक करून निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या घराची झडती घेतली असता त्यांच्या घरात रोख रक्कम सोने आणि चांदी असा एकूण 67 लाख रुपयांचा ऐवज पोलिसांच्या हाती सापडला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button