शहर

खासदार राजेंद्र गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत रेल्वे मार्गिका भूसंपादन संदर्भात वसई येथे रेल्वे परिषद बैठक संपन्न

टाईम्स 9 मराठी न्यूज पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत. भ्रमणध्वनी
क्रमांक -7030516640

पश्चिम रेल्वेचेच्या बोरिवली ते विरार दरम्यान 5 व्या व 6 व्या नव्या रेल्वे मार्गिकेसाठी भूसंपादन केले जाणार असून यामध्ये 5 गावे बाधित होणार आहेत.
रेल्वेकडून येथे 5 व 6 क्रमांकाची मार्गिका टाकली जाणार असून 30 ट्रॅकचे यार्ड तयार करण्यात येणार आहे. रेल्वेकडून अधिसूचना जारी केल्यानंतर याबाबतीत अनेक संभ्रम- समज-गैरसमज तयार केले जात होते. वसई तालुक्यातील बाधित गावातील नागरिक यामुळे तणावात असून नागरिकांची भूमिका तसेच त्यांची मागणी व समस्या जाणून घेण्यासाठी पालघर जिल्ह्याचे खासदार राजेंद्र गावित यांच्या प्रमुख अध्यक्षतेखाली शुक्रवार दिनांक 8 मार्च 2024 रोजी रेल्वे व सर्व संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वसई पूर्व येथे रेल्वे परिषद बैठक आयोजित करण्यात आली होती .

या रेल्वे परिषद बैठकीत उपस्थित बाधित गावातील नागरिकांना दिलासा देऊन त्यांच्या शंकेचे निरासन केले.
सदर बैठकीस रेल्वे प्रशासनाकडून सत्येंद्र कुमार, कैलाश वर्मा, राजकुमार शर्मा तसेच शेखर घाडगे-प्रांत अधिकारी, अविनाश कोष्टी-तहसीलदार, शिरीष कुलकर्णी – जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पालघर, निलेश तेंडुलकर, नवीन दुबे, राजन नाईक, उत्तम कुमार, किरण भोईर आदी पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button