महाराष्ट्र

अनिकेत पाटील यांच्या उपचारासाठी देवदूत म्हणून आले मा. श्री सदाभाऊ खोत

सांगली जिल्हा प्रतिनिधी : आनंद सावंत, टाईम्स 9 मराठी न्यूज, मो. 8007932121

रुग्णसेवाहिचईश्वरसेवा

सांगली: इस्लामपूर (ता. वाळवा) अनिकेत गणेश पाटील, इस्लामपूर हा अत्यंत गरीब घराण्यात वाढलेला, मागच्या महिन्यात शिराळाहून इस्लामपूरकडे जाताना सायंकाळी ०७.०० वाजता त्याची दुचाकी गाडी स्लिप झाली आणि तो डोक्यावरती पडला. तेथील काही लोकांनी त्याला तात्काळ इस्लामपूरमध्ये आणले. त्याच्या घरातील आई-वडील मित्रपरिवार सर्व दवाखान्याकडे धावत निघाले.

मोहसीन पटवेकर, सरफराज डाके हे देखील तिथे पोहोचले. त्यांनी मा श्री सदाभाऊ खोत यांना तात्काळ फोन वरून सर्व माहिती सांगितली, डोक्याला जोरात मार लागला होता. त्या नंतर ते देखील तिथे लगेचच पोहोचले आणि डॉक्टरांशी चर्चा करून त्याला तात्काळ कोल्हापूर येथील ब्रेन स्पेशालिस्ट असलेल्या प्रभू हॉस्पिटल मध्ये हलवण्यास सांगितले आणि तेथील डॉ. प्रभू यांच्याशी देखील त्यांनी स्वतः बोलून घेतलं की याला तुम्ही विशेष लक्ष घालून तात्काळ उपचार करा. प्रभू हॉस्पिटल मध्ये ऍडमिट झाल्यानंतर जवळपास तीन ते चार लाख एवढा खर्च येणार, असे डॉक्टरांनी सांगितले. त्याची आर्थिक परिस्थिती हालकीचे आहे, हे माहित होतं.

त्यांनी तात्काळ मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचा त्याचा फॉर्म भरून घेतला आणि जास्तीचा निधी मंजूर करण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांची “विशेष बाब” म्हणून सही घेतली आणि त्यांच्या उपचारासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून १,५०,०००/- रुपये मंजूर करून दिले. खऱ्या अर्थानं आपल्यासाठी जे कार्यकर्ते अहोरात्र धडपडत असतात, काम करत असतात. त्यांच्याकडे देखील आपण कुटुंब म्हणून पाहणे हे तितकंच गरजेचं असतं आणि एक “कुटुंबप्रमुख” म्हणून त्यांनीते करण्याचा एक छोटासा प्रयत्न केला. या कामी मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे प्रमुख मंगेशजी चिवटे, स्वरूपजी काकडे, निलेशजी देशमुख यांचे सहकार्य लाभले,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button