सोलापूर लोकसभेसाठी राजाभाऊ सरवदे यांनी थोपटले दंड

बी टी शिवशरणं
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे प्रदेश अध्यक्ष तसेच आंबेडकरी चळवळीचा आक्रमक चेहरा सोलापूर जिल्हा लाखो युवकांचे आयडॉल राजाभाऊ सरवदे यांनी येत्या लोकसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षातून निवडणूक लढणारच म्हणून गेल्या आठवड्यात सोलापूर जिल्हा कार्यकारिणी चे बैठकीत जाहिर दंड थोपटले आहेत आणि कोणत्याही परिस्थितीत लोकसभा निवडणूक लढणारच अशी भीम गर्जना केली त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात राजकीय सामाजिक वातावरण ढवळून निघाले आहे आगामी काळात भाजप आणि रिपाई आठवले गट यांची युती असणारच आहे
त्यामुळे सोलापूरची लोकसभेची जागा रिपब्लिकन पक्ष आठवले गटाला कोणत्याही परिस्थितीत मिळणार अशी खूणगाठ कार्यकत्यांनी बांधली आहे सोलापूर जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचा बालेकिल्ला आहे आणि त्याचे नेतृत्व प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ करतात अत्यंत चाणक्य नीती समाजकारण राजकारण यात भक्कम पकड व कार्यकर्त्यांची मोठी पाठीमागे ताकद असलेला वजनदार नेता म्हणून त्यांची जिल्ह्यात ओळख आहे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व पक्ष्याचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांचे विश्वासूं नेते म्हणून ते पक्ष्याच्या कार्यकारिणीत आघाडीचे शिलेदार म्हणून ते त्यांनी मजबूत पकड निर्माण केली आहे रिपब्लिकन पक्ष जिकडे तिकडे विजय हे समीकरण महाराष्ट्राच्या राजकारणात यशाची गुरुकिल्ली बनली आहे
त्यामुळे येत्या लोकसभेला आरपीय आठवले गट व भाजप युतीतून आठवले गटाला लोकसभेची जागा निश्चित सोडन्याची आग्रही मागणी रिपाई कार्यकर्त्यातून आतापासूनच केली जात आहे राजाभाऊ सरवदे हे स्वाभिमानी आक्रमक नेते आहेत त्यांनी मनात आणले तर ते जिल्ह्यातील कोणत्याही निवडणुकीचे चित्र सहज उलटवू शकतात आतापर्यन्त भाजप चे उमेदवार यांना रिपाई पक्ष्याने मदत केली आहे भक्कम साथ दिली आहे मागील निवडणुकीत विधानसभेला युतीतून सहा जागा रिपाईला सोडण्यात आल्या मात्र त्या सहा जागेवर कोणाचे उमेदवार उभे केले तरीही आठवले यांचा आदेश म्हणून त्या जागा भाजपला साथ देऊन निवडून दिल्या
या वेळी कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत युतीतून सन्मानजनक जागा वाट्याला दिल्या पाहिजेत त्यात सोलापूर लोकसभेची जागा यावेळी कोणत्याही परिस्थितीत रिपाईला मिळालीच पाहिजे हा दावा न्हवे अधिकार असल्याची भावना कार्यकर्त्यांची आहे यावेळी राजाभाऊ सरवदे यांनी निवडणूक लढण्याची घोषणा केल्याने कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य उभारी आली आहे पक्षाला राष्ट्रीय मान्यता मिळाल्याने निवडणूक आयोगाच्या नियमानुसार पक्ष संघटन सभासद नोंदणी प्रक्रिया सुरु आहे कार्यकर्ते जोडले जात आहेत पक्ष संघटन व्यापक व मजबूत होत आहे एक मात्र होत आहे राजाभाऊ सरवदे यांच्या निवडणूक लढण्याच्या घोषनेने सोलापूर जिल्ह्यात प्रस्थापित राजकारणी यांनी चांगला धसका घेतला आहे



