अकलूजच्या जिजामाता कन्या प्रशालेची शिफा सिकंदर तांबोळी हिने मिळवले 10 वी च्या परीक्षेत उज्वल यश…

ताहेर मोहोळकर
प्रतिनिधी,टाइम्स 9 न्यूज,अकलूज
शिक्षण प्रसारक मंडळाच्या जिजामाता कन्या प्रशाले मध्ये शिक्षण घेणाऱ्या शिफा सिकंदर तांबोळी या विद्यार्थिनीं ने फेब्रुवारी मार्च महिन्यात झालेल्या एस एस सी बोर्डाच्या परीक्षेत 97 टक्के गुण मिळवत संस्थेत दुसरी येण्याचा मान मिळवला
97 टक्के गुण मिळवून देखील आपले भान हरपवू न देणाऱ्या शिफा सिकंदर तांबोळी याने टाइम्स 9 न्यूज चे अकलूज प्रतिनिधी आमीर मोहोळकर यांच्याशी विनम्र पणे बोलताना असे सांगीतले की,तिच्या या यशा मध्ये आज्जी,आजोबा,आई,वडील,चुलते आणि भाऊ यांच्या सह जिजामाता कन्या प्रशालेच्या गुरुजन वर्गाचा हि मोलाचा वाटा असल्याचे तिने सांगितले…

शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थे मध्ये दुसरी आल्याने “जाणतेराजे” जयसिंह मोहिते पाटील तथा बाळदादा,युवा नेते संग्रामसिंह (अण्णासाहेब) मोहिते पाटील,कु स्वरूपाराणी (दिदी साहेब) मोहिते पाटील यांच्या सह तरुण तडफदार युवा नेते सयाजीराजे मोहिते पाटील यांनी शिफा सिकंदर तांबोळी हिचे विशेष कौतुक केले…
अकलूज येथील मुस्लिम समाजातील जेवढे विद्यार्थी एस एस सी बोर्डाच्या परीक्षेला बसले होते त्या सर्व विद्यार्थ्या मधून पहिली येण्याचा मान देखील शिफा सिकंदर तांबोळी या विद्यार्थिनींने मिळवल्याने तांबोळी समाजा सह सर्वच समाज घटकातून त्याचे विशेष अभिनंदन करण्यात येत आहे…

या वेळी शिफा सिकंदर तांबोळी याचे वडील सिकंदर तांबोळी यांचे आनंद अश्रू मात्र लपू शकले नाही,टाइम्स 9 शी बोलताना ते असे म्हणाले की,शिफाच्या पुढील शैक्षणिक वाटचाली साठी काही ही करण्याची माझी तयारी असुन तिने शिक्षण घेऊन जनतेची सेवा करावी आमच्या कुटुंबाच्या “दुआ हमेशा शिफा सोबत असतील” असे हि ते शेवटी म्हणाले…



