शहर

डहाणू भूमी अभिलेख कार्यालयातील उपअधीक्षक भूमी अभिलेखापाल गोरख घुमरे आणि उपअधीक्षक भूमी अभिलेख प्रफुल्ल संखे या दोघांना 30,000 रुपयांची लाच स्वीकारताना पालघर पोलीस उपअधीक्षक दयानंद गावडे यांनी केले रंगेहात अटक

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क

पालघर जिल्हा प्रतिनिधी

विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक -7030516640

मोजणी केलेल्या जमिनीची हद्द दाखवून मोजणी नकाशा तयार करून देण्यासाठी लाचेची मागणी करून तिचा स्वीकार करणाऱ्या डहाणू भूमी अभिलेख कार्यालयातील उपअधीक्षक अभिलेखापाल गोरख घुमरे आणि उपअधीक्षक भूमी अभिलेख प्रफुल्ल संखे या दोघांनी (30,000) तीस हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून ती लाच स्वीकारल्याप्रकरणी अँटी करप्शन ब्युरो पालघर विभागाचे पोलीस उपअधीक्षक दयानंद गावडे यांच्या पथकाने या दोघांना पंचा समक्ष सोमवारी रंगेहात अटक करून त्यांच्याविरुद्ध डहाणू पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत.

(36 )वर्षीय पुरुष तक्रारदार यांच्या मामाच्या मुलाच्या मालकीच्या जमिनीची मोजणी डहाणू भूमी अभिलेख कार्यालयातून झाली होती. या मोजणी झालेल्या जमिनीची हद्द दाखवून देण्यासाठी व नकाशाची प्रत तयार करून देण्यासाठी डहाणू भूमी अभिलेखापाल उपअधीक्षक गोरख शंकर घुमरे वय वर्ष (39) आणि भूमी अभिलेख उपअधीक्षक प्रफुल्ल लक्ष्मण संखे वय वर्ष (54 ) या दोघांनी तक्रारदार यांच्या कडे (30,000)तीस हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.याबाबत तक्रारदार यांनी या दोघांची लेखी तक्रार अँटी करप्शन ब्युरो पालघर कार्यालयात केली होती. या तक्रारीची पडताळणी करून सुनील लोखंडे पोलीस अधीक्षक करप्शन ब्युरो ठाणे परिक्षेत्र व महेश तरडे अप्पर पोलीस अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो ठाणे परिक्षेत्र तसेच सुधाकर सुराडकर अप्पर पोलीस अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो ठाणे परिक्षेत्र यांच्या मार्गदर्शनाखाली अँटी करप्शन ब्युरो पालघर पोलीस उपअधीक्षक दयानंद गावडे सह पोलीस निरीक्षक शिरीष चौधरी, पोलीस हवालदार संजय सुतार, पोलीस हवालदार नवनाथ भगत, पोलीस हवालदार योगेश धारणे, पोलीस हवालदार विलास भोये, पोलीस शिपाई चालक जितेंद्र गवळे, पोलीस शिपाई चालक सखाराम दोडे या पथकाने सोमवार दिनांक 26 फेब्रुवारी 2024 रोजी संध्याकाळी 18.06 वाजता सापळा रचून पंचा समक्ष उपअधीक्षक भूमी अभिलेखापाल गोरख शंकर यांनी तक्रारदार यांच्याकडून 5000 रुपये आणि उपअधीक्षक भूमि अभिलेख प्रफुल्ल संख्ये यांनी 25000 हजार अशी एकूण 30,000 हजार रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी या दोघांना रंगेहात अटक करून त्यांच्या विरुद्ध डहाणू पोलीस ठाण्यात 26 फेब्रुवारी रोजी रात्री गुन्हे दाखल केले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button