शहर

एटीएम कार्ड चोरुन लाखों नागरिकांना गंडा घालणाऱ्या आरोपींच्या भिगवण पोलिसांनी मुसक्या आवळल्या : ५१ एटीएम कार्ड आणि ५ लाख १० हजारांचा मुद्देमाल हस्तगत

इंदापूर प्रतिनिधी, एस. बी. तांबोळी,
मोबाईल – 8378081147

भिगवण पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये एटीएम कार्ड चोरुन अनेक लोकांना पैसे काढून देण्यांच्या बहाणा करीत लाखो रुपये घालणाऱ्या टोळीला भिगवण पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

पोलीस सूत्रांकडूंन मिळालेल्या माहितीवरुन भिगवण पोलीस ठाण्यांत एटीएम चोरुन अनेक नागारिकांना गंडा घालुन पैसे काढून देनाचा बहाणा करीत अशी फिर्याद दाखल होती. सदर गुन्हेच्या अनुषंगाने भिगवण पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकांच्या पोलीस अधिकाऱ्यांना सदर गुन्हा उघडकीस अन्याबाबत सूचना केल्या.

गुन्ह्यांच्या अनुषंगाने भिगवण पोलीस ठाण्यांचे तपासणी अधिकारी आरोपींच्या चांगलेच शोधात होते. तसेच पुण्यातील अज्ञात आरोपींचा शोध तांत्रिक विश्लेषण व एटीएम सेंटर मधील कॅमेरे टोलनाक्यांवरचे सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपींची ओळख पटवून सदर आरोपींनी मुंबई ठाणे महामार्गाकडे धूम ठोकली होती.

अखेर भिगवण पोलिसांना आरोपींचा सुगावा लागला त्यांनी पाठलाग करीत तीन आरोपींना ताब्यांत घेतले सखोल चौकशी करुन त्यांनी गुन्हा केल्यांचे भिगवण पोलिसांनकडे कबूल केले. सदर आरोपींच्या कब्जातून सुमारे ५१ एटीएम कार्ड आणि ५ लाख १० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

सदरची कामगिरी पुणे ग्रामीण जिल्हा पोलीस प्रमुख अंकित गोयल अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार पोलीस उपनिरीक्षक रुपेश कदम, पोलीस अंमलदार सचिन पवार, महेश उगले, हसीम मुलाणी, रणजित मुळीक आदीं पोलीस कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला. भिगवण पोलिसांच्या दमदार कामगिरीमुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांसह जनतेतून कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button