शहर

18 हजार रुपयांची लाच स्वीकारताना कल्याण पोलीस हवालदार धनंजय फर्डे.. पोलीस निरीक्षक पल्लवी ढगे पाटील यांच्या जाळ्यात अटक

पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक.7030516640. पालघर जिल्हा वृत्तांत

कल्याण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल असलेल्या एका महिलेवर कारवाई न करण्यासाठी 18 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून तिचा स्वीकार केल्याप्रकरणी कल्याण पोलीस ठाण्याचे हवालदार धनंजय फर्डे यांना गुरुवारी दुपारी अँटी करप्शन ब्युरो विभाग ठाणे महिला पोलीस निरीक्षक पल्लवी (ढगे) पाटील यांच्या पथकाने सापळा रचून रंगेहात अटक करून या हवलदाराविरुद्ध कल्याण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

ठाणे जिल्ह्यातील कल्याण पोलीस ठाण्यात एका महिलेवर तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. तक्रार दाखल केलेल्या या महिलेवर कल्याण पोलीस ठाणे यांच्याकडून कारवाई न करण्यासाठी कल्याण पोलीस ठाण्यातील कार्यरत पोलीस हवालदार बक्कल नंबर 257 धनंजय लक्ष्मण फर्डे वय वर्ष (48) यांनी या महिलेकडे 2 मार्च 2023 रोजी 18 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. याबाबत या महिलेने या हवलदाराची लेखी तक्रार अँटी करप्शन ब्युरो विभाग ठाणे यांच्या कार्यालयात केली होती

या तक्रारीची पडताळणी करून अँटी करप्शन ब्युरो पोलीस अधीक्षक श्री.सुनील लोखंडे (ठाणे परिक्षेत्र) व श्री अनिल घेरडीकर अप्पर पोलीस अधीक्षक (ठाणे परिक्षेत्र) यांच्या मार्गदर्शनाखाली अँटी करप्शन ब्युरो ठाणे पोलीस निरीक्षक पल्लवी (ढगे) पाटील यांच्या पथकाने गुरुवार दिनांक 2 मार्च 2023 रोजी दुपारी पावणेदोन वाजता सापळा रचून हवालदार धनंजय फर्डे यांना तक्रारदार महिलेकडून 18 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक करून या पोलीस हवालदारावर कल्याण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button