केळवा सागरी पोलीस ठाणे हद्दीतील शेतकऱ्याच्या शेतात चोरी

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क. विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक.7030516640.पालघर जिल्हा वृत्तांत
केळवा सागरी पोलीस ठाणे हद्दीतील जोगाळे पाड्यातील एका शेतकऱ्याच्या शेतातील फळझाडांना व शेतीला पाणी सोडण्याची मोटर पंप मशीन चोरीला गेल्या बाबत या शेतकऱ्याने अज्ञात चोराविरुद्ध केळवा सागरी पोलीस ठाण्यात पोलीस तक्रार दाखल केली आहे.

केळवा सागरी पोलीस ठाणे हद्दीतील रस्त्याच्या बाजूला ठिकाण जोगाळे पाडा येथे लक्ष्मीकांत केशव वर्तक वय वर्ष 57 राहणार जोगाळेपाडा यांची भात शेती आणि वाडी आहे.

या भात शेतीला आणि फळझाडांना पाणी सोडून गुरुवार दिनांक 21 सप्टेंबर 2023 रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता लक्ष्मीकांत वर्तक आपल्या घरी आले असताना रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन अज्ञात चोरांनी त्यांच्या शेतातील केबिनमध्ये बसवलेली 3 HP ची अंदाजे 30 ते 40 हजार रुपये किमतीची पाणी सोडण्याची मशीन चोरी केली आहे.

याबाबत लक्ष्मीकांत वर्तक यांनी शुक्रवार दिनांक 22 सप्टेंबर 2023 रोजी अज्ञान चोरा विरुद्ध केळवा सागरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.. याबाबत केळवा सागरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक भीमसेन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली केळवा सागरी पोलीस या अज्ञात चोराचा कसून शोध घेत आहे.




