राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे सामाजिक न्याय विभाग झोपेत आहे काय…? : – लालासाहेब अडगळे

आमीर मोहोळकर,प्रतिनिधि,टाइम्स 9 न्यूज,अकलूज
9890299499
सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष प्रा धनंजय साठे यांनी दिनांक 29 जुलै 2024 रोजी पंढरपूर येथील के बी पी कॉलेज समोर हॉटेल धनश्री येथे दुपारी 1 वाजता प्रदेश अध्यक्ष पंडित कांबळे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली सामाजिक न्याय विभागाची आढावा बैठक बोलावली असुन सदरच्या कार्यक्रम पत्रिकेत महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री”अजातशत्रू” आदरणीय मा.श्री.विजयसिंह मोहिते पाटील साहेब आणि सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव खासदार मा. धैर्यशील मोहिते पाटील असताना यांच्या नावांचा उल्लेख ही केलेला दिसत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट सामाजिक न्याय विभाग झोपेत आहे का…? असे उदगार अकलूज येथील सामाजिक कार्यकर्ते लालासाहेब अडगळे यांनी काढले…

पुढे बोलताना लालासाहेब अडगळे असे हि म्हणाले की,सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उत्तमराव जानकर यांना निमंत्रित केले असुन उत्तमराव जानकर हे धनगर समाजाचे नेते आहेत.हे सबंध महाराष्ट्र जाणतो परंतु ते भाजपा वासी असताना देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादाने खोटा खाटीक जातीचा दाखला मिळवण्यात यशस्वी झाले होते.अनु.जातीचे हक्काचे लाभ त्यांनी या खोट्या दाखल्यांच्या अंधारे लुटले आहेत.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी अनु. जातींना योग्य न्याय मिळावा. सामाजिक,राजकीय,शैक्षणिक क्षेत्रा मध्ये त्यांच्यासाठी स्वतंत्र अधिकार राखून ठेवलेले असताना. धनगर समाजाचे नेते उत्तमराव जानकर यांनी संविधानाला छेद करत आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी बोगस कागदपत्रांच्या आधारे अनुसूचित जाती चा दाखला मिळविला होता.तो सद्या उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. लवकरच यावर निर्णय होईल.ज्यांनी स्वताच्या स्वार्थासाठी अनु. जाती मधिल शोषित, पिडित, समाजांचे हक्काचे लाभ उघडपणे लुटले आहेत.त्यांना सामाजिक न्याय काय असतो काय कळणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट जाणीवपूर्वक मोहिते पाटील यांना डावलण्याचे काम करत आहे. हे स्पष्ट या पोस्टर्स वरून लक्षात येत आहे.
सदर कार्यक्रमातील वरील दोन्हीं घटना ह्या अशोभनीय असुन,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे सामाजिक न्याय विभागाने याची तात्काळ दखल घेऊन संबंधित पदाधिकाऱ्यांनी माफी मागावी अन्यथा मोहिते पाटील गटाच्या रोषास सामोरे जावे असे आवाहन हि लालासाहेब अडगळे यांनी केले…
सामाजिक न्याय विभागाच्या ह्या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका आपल्या सोशल मीडिया हॅण्डल द्वारे पब्लीश करुन लालासाहेब अडगळे यांनी या घटनेचा तीव्र शब्दात जाहीर निषेध व्यक्त केला…



