महाराष्ट्र

“पद्मश्री” पुरस्कार विजेते मारुती चित्तमपल्ली यांचे निधन…

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क

सोलापूर जिल्ह्याचे सुपुत्र,ज्येष्ठ साहित्यिक,पर्यावरणप्रेमी आणि पक्षीमित्र मारुती चित्तमपल्ली यांचे दुःखद निधन झाले असुन त्यांच्या निधनाने साहित्य,पर्यावरण आणि सामाजिक कार्यक्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे…

मारुती चित्तमपल्ली यांचा जन्म ५ नोव्हेंबर १९३२ रोजी सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील मोरेवाडी या गावात झाला,लहानपणापासूनच त्यांना निसर्ग आणि पक्ष्यांबद्दल अपार प्रेम होते.त्यांनी आयुष्यभर वन्यजीव संवर्धन,पक्षी निरीक्षण आणि निसर्गप्रेम जागवणाऱ्या लेखन कार्याद्वारे समाजाला मार्गदर्शन केले…

त्यांच्या लेखनशैलीमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन,साहित्यिक समृद्धी आणि निसर्गाशी असलेली आत्मिक नाळ दिसून येत होती…

त्यांचे ‘वनवासी’, ‘पक्षीनिधी’, ‘रानवाटा’, ‘पक्षीकथा’ यासारखे अनेक ग्रंथ अत्यंत लोकप्रिय ठरले.त्यांनी महाराष्ट्र वनसेवेतील अधिकारी म्हणूनही उल्लेखनीय सेवा केली आणि निवृत्तीनंतरही निसर्गप्रेम जागवणारे कार्य अखंड चालू ठेवले…

त्यांच्या निस्वार्थ कार्याची दखल घेऊन २०२५ साली भारत सरकारने त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार प्रदान केला होता,दिल्ली येथून हा पुरस्कार प्राप्त केल्या नंतर ते बेड रेस्ट वरच होते,अशी माहिती सुत्रांनी दिली…

त्यांचे स्वप्न होते की भारतातील प्रत्येक नागरिकाने निसर्गाशी संवाद साधावा,पर्यावरणाचा सन्मान करावा आणि भावी पिढ्यांसाठी शुद्ध, हिरवा वारसा सोडावा…

सोलापूरने एका संवेदनशील,निसर्गनिष्ठ,विचारवंत व्यक्तिमत्त्वाला गमावले असुन मारुती चित्तमपल्ली हे सोलापूरचे अभिमान होते आणि राहतील.त्यांच्या स्मृती सोलापूरकरांच्या मनात सदैव जिवंत राहतील…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button