मालेगाव चां बोध ,,,, शिवसेनेचे घुमजाव,,, बदललेला ट्रॅक ,, आणि बहुजनांच राजकारण

ऍड अविनाश टी काले डॉ आंबेडकर चौक , अकलूज , तालुका माळशिरस , जिल्हा सोलापूर
मो न 9960178213
माझ्या पुढे दररोज नव नवीन सामाजिक राजकीय घडामोडी येत राहतात , त्यातून काय निवडायचे व कोणते निष्कर्ष काढायचे आणि त्याची संगती लाऊन ते विश्लेशीत करायचे ?असा प्रश्न पडतो काल मी केलेल्या एका टिपण्णी वर , जे शोषित आहेत , ओबीसी आहेत त्यांना मान्य असताना तुम्ही का मान्य करत नाही?असा प्रश्न एकाने विचारला होता त्यावर मी उत्तर दिले
“मी झुंडी चे मागे फरफटत जाणारा नाही”हजारो , लाखो लोक स्वीकारतात म्हणून मी ते स्वीकारावे अस कधी वाटलं नाही , त्याचे राजकीय आर्थिक तोटे मला माहित आहेत , परंतु मी तोट्याचा विचार करत नाही ,
मी जे स्वीकारलं आहे त्याची निवड मी केली आहे,आणि त्याचे परिणाम म्हणून मिळणारी कडू गोड फळे स्विकारण्याची माझी नेहमीच तयारी आहे व राहणार सकाळी माझ्या वॉल वर एक पोस्ट आली , बहुजन मुक्ती पार्टी चे राज्य स्तरीय नेते ऍड राहुल जी मखरे साहेब यांची ती पोस्ट त्यांच्याच कार्यकर्त्याने प्रसारित केली होती व ते माझे फेसबुक मित्रांचे यादीत आहेत त्या पोस्ट मधील मतितार्थ इतकाच होता की भारतातील सर्व विरोधी पक्षात गैर भाजपा लढाईचे बीज पेरून सत्ता आणली तरी ही आघाडी किती दिवस ?किती वर्ष टिकेल?
या राजकीय सत्ता पालटाने भाजपाला किंवा संघाला कायमचे पराभूत करता येऊ शकेल काय?दुसरा त्यातील तार्किक मुद्दा हा होता की , कट्टर हिंदुत्वाला टक्कर देण्याची क्षमता सॉफ्ट हिंदुत्वा त आहे काय?हिंदुत्वाच्या पीच वर तुम्ही भाजपला पराभूत करू शकणार नाही
या दोन्ही बाबीत सत्य आहे आणि ते नाकारण्यात अर्थ नाही परंतु याचा पर्याय काय असेल? बहुजन मुक्ती पार्टी हा आजच्या घडीला भाजपा सोडा , त्याच्या तुलनेत कुठेही नसलेल्या प्रस्थापित प्रादेशिक पक्षांशी ही टक्कर घेऊन जिंकून दाखवतील ही क्षमता त्यांचे कडे नाही
माझा नेहमी जो आक्षेप राष्ट्रवादी काँग्रेस वर असतो तो हाच आहे की , त्यांचा भाजपशी असलेला लढा हा ब्राह्मण वर्चस्व वादाच्या विरोधात आहे ,
राजकीय सत्ता क्षत्रिय म्हणून आमच्या हातात द्या (मराठा)व धार्मिक सत्ता म्हणून तुम्ही देवळात बसा ,,, त्यांची लढाई हिंदुत्व वादाच्या विरोधात नाही , कारण ते सर्व नेते हे हिंदू धर्मीय आहेत व हिंदू धर्म श्रध्दा त्यांचे ही ठाई आहे ही सत्ता प्रत्यक्षात उतरवण्यासाठी त्यांना ही आंबेडकर वादी समाजाची साथ हवी आहे , परंतु त्यांचे नेतृत्व हे सेल आणि एक दोन जागा इतकेच मर्यादित ठेवायचे आहे भाजपच्या हातून राज्यातील सत्ता खेचून घेताना त्यांनी शिवसेनेला अलगद बाहेर काढले ,भाजपच्या केंद्रीय सत्तेला आम्ही नमवू शकू असा त्यांचा विश्वास होता ,परंतु भ गौतम बुद्ध यांनी पराभवाची 10 कारणे सांगितली त्यातील एक कारण असे आहे की क्षत्रिय असल्याचा वृथा अभिमान बाळगून चक्रवर्ती सम्राटाशी जो युद्ध पुकरतो त्यात कमजोर क्षत्रिय पराभूत होतो
हिंदुत्वाची परिभाषा ही सावरकर यांनी केली आहे , तशी च त्याची वैचारिक मांडणी आणि त्या साठीचे संघटन हे डॉ बळीराम केशव हेडगेवार यांनी उभे केले आहे ज्यास आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असे म्हणून ओळखतो , व 1925पासून ते समाजातील सर्व घटकात यावर काम करत आहेत प्रबोधकार ठाकरे हे हिंदू समाज सुधारक होते , ब्राम्हणी वर्चस्व वादाच्या विरोधात होते , पण हिंदू असण्याची वैचारिक चौकट त्यांनी मोडली नव्हती , म्हणून पर धर्मात गेलेल्यांचे शुध्दीकरण त्यांनी घडवून आणले होते
हिंदुत्व हा शिवसेनेचा पाया आहे व याच पायावर त्यांनी हिंदुतील ओबीसी , भटके विमुक्त , एस सी , एस टी अश्या वर्गातील लोक आपले कार्यकर्ते बनवले ,त्यांना वैचारिक खुराक म्हणून शिवसैनिकांच्या थाळीत , कडवे हिंदुत्व , हिंदुत्वाची चिकित्सा करणाऱ्या आंबेडकर वादी समूहाला व अल्पसंख्यांक मुस्लिम समाजाला टार्गेट करण्याचे विचार धन “मार्मिक”मधून देण्यात आले हे वास्तव झाकून अनेक आंबेडकर वादी शिवसेनेच्या पारडी कडे विशेषतः शिवसेनेची सत्ता गेल्या नंतर व त्यांचे विरोधात कायदेशीर यंत्रणेचा अनुचित वापर सुरू केल्या नंतर झुकले
प्रा सुषमा ताई अंधारे , यांचे माध्यमातून सुरू झालेल्या प्रबोधन यात्रे ने शिवसैनिकात जोश आणला , पण
त्यांची वैचारिक कोंडी एक ना एक दिवस होणार ही बाब सुध्दा तितकीच खरी आहे राहुल गांधी यांच्या वरील द्वेष मूलक कारवाई नंतर त्यांच्या प्रति ही सहानुभूती वाढली , परंतु प्रत्यक्ष राजकारणात सहानुभूती पक्ष वाढी साठी अनुकूल ठरत नाही , त्या साठी आधार लागतो
पवार साहेबांच्या भाषेत पूर्वी काँग्रेस उत्तर प्रदेशातील जमीनदार वर्गाच्या हवेल्या सारखी वैभव संपन्न होती आता ते वैभव राहिलेले नाही
याचे कारण ते जमीनदार आता भाजप कडे गेले आहेत सत्ता स्थापनेत केलेल्या तडजोडी आपले अस्तित्व मिटवून टाकतील याच भीतीने उद्धव जी ठाकरे साहेब यांनी सावरकर ही आमची अस्मिता आहे असे वक्तव्य मालेगाव येथे केले छत्रपती शिवरायांचे राज्य म्हणजे “काक तालिय योग”होता (कावळा बसणे व फांदी मोडणे) असा त्याचा अर्थ आहे अशी मांडणी सावरकर यांनी केली
हिंदू कोण ?आसेतू हिमालय ते कन्याकुमारी पर्यंत ज्यांची पुण्य भूमी आणि मातृभूमी आहे ते ते हिंदू ” ही व्याख्या स्पष्ट करते की भारताच्या बाहेर असणारी ज्यांची श्रध्दा केंद्र आहेत ते ते सारे परकीय आहेत , जसे की “काबा ” मक्का व मदिना ,आणि जेरुसलेम
याचे ही पुढे गेलात तर पारशी ही परदेशी ठरतील व लुंबिनी हे नेपाळ मध्ये असल्याने बौद्ध अनुयायी ही भारताबाहेरील ठरतील मूळ लढाईचा मुद्दा हाच आहे की हिंदू राष्ट्रातील सामाजिक , आर्थिक , शैक्षणिक , राजकीय , धार्मिक रचना काय असतील? त्या अजेंड्यावर जनतेत थेट चर्चा केल्याशिवाय ही वैचारिक जागृती येणार नाही हिंदुत्व आणि हिंदू राष्ट्रवाद हे सोनेरी हरीण आहे पण ते कुणा साठी?हा प्रश्न थेट चर्चिला गेला पाहिजे राजकीय उदारमतवादाच्या आधारे आधार शोधाल तर शेवटी वापरून निरोध सारखे फेकले जाल हे वास्तव समजून घेऊन हे प्रबोधन फक्त वंचित बहुजन आघाडी चे माध्यमातूनच केले जाऊ शकते या बद्दल माझ्या तरी मनात शंका नाही काँग्रेस पक्षाला अस्तित्वाची लढाई लढायची आहे तिने वंचित सोबत यावे अस मला वाटत



