महाराष्ट्र

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माळशिरस तालुका मा.संघटक रोहित नलावडे यांचा “वंचित” बहुजन आघाडी मध्ये जाहीर प्रवेश

टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क

लोकशाहीचे सामाजिकीकरण करणारा तसेच सर्वसामान्यांना पक्षात संधी देणारा राजकीय पक्ष म्हणून “वंचित बहुजन आघाडी” हा राजकीय पक्ष महाराष्ट्रात सर्वांना परिचित आहे.त्यामुळे वंचित बहुजन आघाडी पक्षात दिवसेंदिवस प्रवेश करणार्‍यांची संख्या वाढत आहे. राष्ट्रवादी कॉग्रेसचे सामाजीक न्याय विभागाचे माळशिरस तालुका मा. संघटक मा. रोहित नलावडे यांनी वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश केला.

वंचित बहुजन बहुजन आघाडीचे माढा लोकसभा विभाग जिल्हाध्यक्ष राहुल चव्हाण यांच्या हस्ते नलावडे यांना प्रवेश देण्यात आला. सदरचा प्रवेश जिल्हा उपाध्यक्ष विजय (भाऊ ) कोकणे यांच्या प्रयत्नातुन झाला, यावेळी जिल्हा उपाध्यक्ष पांडुरंग केंगार, जिल्हा कोषाध्यक्ष अभिमान जगताप , जिल्हा कायदेशीर सल्लागार ॲड. सुमित सावंत,ता. उपाध्यक्ष प्रदिप सरवदे. जेष्ठ नेते श्रीकांत सावंत,भालचंद्र यादव यांच्या प्रमुख उपस्थीतीत प्रवेश प्रक्रीया पार पडले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button