अकलूज अध्यापक विद्यालयात अध्यापक छात्र व छात्र अध्यापिकांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न

उपसंपादक——- हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो . 97 30 867 448
अकलूज येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कै.सौ.अरूणादेवी देसाई अध्यापक विद्यालयातील साल २००९-१० वर्षातील माजी छात्र अध्यापक आणि छात्र अध्यापिकां यांचा स्नेहमेळावा रविवारी दि २१ रोजी अकलूज(माळेवाडी) येथे उत्साहात पार पडला .

प्रारंभी जुल्कर शेख यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली याप्रसंगी पश्चिम महाराष्ट्र , मराठवाडा येथील माजी छात्र अध्यापक यांनी विद्यालयीन जीवनातील आठवणींना उजाळा दिला तसेच या तुकडीतील सध्या जिल्हा परिषद नियुक्त , शासकीय विभागांमध्ये सेवा बजावणारे , व्यावसायिक आणि प्रगतशील शेतकरी यांचा गुणगौरव करण्यात आला .

या स्नेह मेळाव्यास जुल्कर शेख, प्रदीप मिसाळ, गोपाळ लावंड, गणेश करडे, सोनाली जगताप, शुभांगी बादल ,संदीप थोरात, अनिल शेंडगे ,निता कोकाटे, सीताबाई पवार ,गजानन जाधव, अभिजीत कुरुळे ,स्वाती रणदिवे, निलेश भोसले, गोविंद पवार, दिपाली हिलाल, रजनी शिंदे, श्रेयश बारबोले ,बळीराम वाघमारे, रूपाली वरकड ,रेश्मा बनकर, श्वेता यादव ,राहुल सरवदे, प्रणिता नवगिरे ,इत्यादी छात्र अध्यापक व अध्यापिका उपस्थित होते
कार्यक्रमासाठी माजी छात्र अध्यापक जुल्कर शेख यांनी सहकार्य केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संयोजक म्हणून गोपाळ लावंड , सोनाली जगताप , गोविंद पवार , प्रदीप मिसाळ यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश करडे यांनी तर आभार संदीप थोरात यांनी मानले



