खोटे गुन्हे दाखल करून अंबादास (अण्णा) ओरसे यांच्या सारखे बहुजन नेतृत्व संपविण्याचा प्रयत्न

टाइम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
अंबादास ओरसे यांची सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाल्यापासून काही विघ्न संतोषी या ना त्या कारणाने गेल्या काही महिन्यांपासून बदनाम करुन बहुजन नेतृत्व संपवण्याचा प्रयत्न चालू आसुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून स्वाभिमानी कार्यकर्त्यांची मजबूत फळी बांधून अण्णा ओरसे बहुजनांच्या कल्याणासाठी धडपडत अशा नेतृत्वावर मात्र खोटे गुन्हे दाखल करून गरजवंतांच्या पाठीशी उभे राहणाऱ्या अण्णा ओरसे यांना अडकविण्याचे षडयंत्र त्यांच्या विरोधकांकडून आखले जात असल्याचे राष्ट्रवादी च्या कार्यकर्त्यांमधून बोलले जात आहे.
अण्णा ओरसे यांची भाची रेणुका चंद्रकांत शिंदे ही संतोष लक्ष्मण लोंढे यांच्या सुमित्रानगर, यशवंतनगर येथील बिल्डींगमधील वन रूम किचनमध्ये ३२०० रूपये भाडे देऊन राहत होती. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून आर्थिक अडचणीमुळे त्यांचे घरभाडे थकीत राहिले होते. यादरम्यान घरमालक संतोष लक्ष्मण लोंढे यांनी भाड्यासाठी तगादा लावला होता.

मात्र दि. १८/२/२०२३ रोजी रेणुका शिंदे यांची सासू मयत झाल्याने त्या कोथरूडला गेल्या होत्या. तेव्हा घरमालकाने त्यांचे घरातील साहित्य बाहेर काढल्याचे त्यांच्या पत्नीने व्हाट्सअप कॉल करून रेणुका शिंदे यांना सांगितल्याने त्या दिनांक २४ मार्च २०२३ ला छोटा हत्ती घेऊन आपले सामान घेऊन जाण्यासाठी आल्या. परंतु सामान भरत असताना त्यांना एक गॅसची टाकी दिसून आली नाही. त्यामुळे याबाबत त्यांनी घरमालकाला विचारले असता तुमची एकच गॅसची टाकी आहे. आम्ही तुमची गॅस टाकी कशाला घेऊ असे म्हणत रेणुका शिंदे यांच्याशी घरमालकाने बाचाबाची केली.
यावेळी रेणुका शिंदे त्यांचे अंगावर धाऊन जात असताना घरमालक संतोष लोंढे याने रेणुका शिंदे यांच्या केसाला धरून बाजूला ढकलले. तेव्हा त्यांचे कपाळ भिंतीला धडकून त्या खाली पडल्या. त्यानंतर संतोष लोंढे याने रेणुका शिंदे यांच्या गळ्याजवळील कॉलरला लज्जा वाटेल असे धरून ओढणी ओढून घेतली आणि थांब तुला बघतो असे म्हणाला. यादरम्यान त्यांना सोडविण्यासाठी त्यांची मावशी संजना धोत्रे व पती चंद्रकांत आले असता संजना धोत्रे यांचा उजवा हात पिरगळला व त्याने दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या नगमा मॅडम (पूर्ण नाव माहिती नाही) यांना मोठ्याने हाक मारून बोलविले. तेव्हा नगमा मॅडम धावत खाली आली आणि घरमालकांसोबत बाजूला जाऊन त्यांचे काहीतरी बोलणे झाले.

त्यानंतर रेणुका शिंदे यांच्याकडे येऊन तू गॅसटाकी साठी मालकासोबत का भांडत आहे? तुला दुसरी टाकी आणायला लावते असे म्हणून तिने त्यांना बाजूला ढकलून दिले. त्यामुळे त्या खाली पडल्या असता त्यांच्या पतीने व मावशीने त्यांना उचलून बाजूला बसवले. नंतर थोड्या वेळात घरमालक संतोष लोंढे यांनी दुसरी गॅसटाकी कुठून तरी आणून दिली. मात्र नगमा मॅडम यांनी तुला पोरांना सांगून जीवे ठार मारीन अशी धमकी देऊन चंद्रकांत शिंदे यांना घाणेरड्या शिव्या दिल्या. तेव्हा राष्ट्रवादीचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष अंबादास (अण्णा) ओरसे यांनी त्याठिकाणी जाऊन सदरचे प्रकरण मिटवून आपल्या भाचीला तेथील सामान दुसरीकडे न्यायला सांगितले.
मात्र सदरचे प्रकरण पूर्णपणे पोलिसा समक्ष मिटल्यानंतर त्यांच्या विरोधकांच्या सांगण्यावरून अंबादास (अण्णा) ओरसे यांच्यावरच भादंवि कलम ३२३, ३५४, ४५२, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे खोटा गुन्हा दाखल करून त्यांना अडकविण्याचे बहुजन नेतृत्व नेस्तनाबुत करण्याचे षडयंत्र सुरू आहे असे त्यांच्या समर्थकांतून बोलले जात आहे. तसेच सदरचा गुन्हा हा गावातील राजकीय सूडबुध्दीने दाखल केला आसल्याचे आंबादास ओरसे यांनी सांगितले असुन ते पुढे म्हणाले कि आपल्या एका खुब्याची शस्त्रक्रिया होऊन दुसराही खुबा ‘ ‘ पूर्णपणे खराब झालेला असताना अंबादास (अण्णा) ओरसे राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष वाढवून सुशिक्षित बेकारांना रोजगार मिळवून देण्यासाठी धडपडत आहेत.
त्याचबरोबर त्यांच्या माध्यमातून बहुजनांचे एक चांगले नेतृत्व पुढे येत असताना त्यांचे लक्ष विचलित करून त्यांना जाणीवपूर्वक त्रास देण्याच्या हेतूने त्यांचेवर खोटा गुन्हा दाखल केला असल्याचे बोलले जात आहे. मात्र अकलूजचे पोलिस या गुन्ह्यातील तथ्य कशा पद्धतीने शोधून वस्तुस्थिती काय आहे याचा शोध कशा प्रकारे लावणार ? याकडे अकलूजकरांचे लक्ष लागले असुन त्या दोघींनी परस्परा विरोधी फिर्याद दाखल केल्या आहेत.



