महाराष्ट्र
कोडोली च्या यशवंत शिक्षणशास्त्र महाविद्यालयात महात्मा फुले जयंती

प्रतिनिधी ----प्रा. विश्वनाथ पाटील , कोडोली जि .कोल्हापूर
कोडोली, ता. 11 : येथील यशवंत शिक्षणशास्त्र महाविद्यालयात क्रांति सूर्य सत्यशोधक महात्मा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. त ळ सं दे ( ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) येथील ए. व्ही. एम. इंग्लिश स्कूलचे संस्थापक अध्यक्ष व माजी विद्यार्थिनी चे पालक छ न्नू सिं ग मोहिते यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. विश्वनाथ पाटील होते.
यावेळी महात्मा फुले यांच्या अ तु ल नी य कामगिरीचे वर्णन करणारी भाषणे झाली. " महात्मा फुले यांनी त्रास सहन करून शिक्षणाचा प्रसार केला, " असे गौरवोद्गार सर्वच वक्त्यांनी काढले. त्यांच्या त्यागा मुळेच आज सर्वसामा न्या ना शिक्षण मिळत असल्याचे प्रशिक्षणार्थी मयुरी पाटील यांनी त्यांच्या भाषणात स्पष्ट केले.
अयोध्या पाटील यांनी आभार मानले. याप्रसंगी प्रा. डी. डी. पाटील, प्रा. श्रीमती जी. के. मुजावर, प्रा. संजय जाधव, वरीष्ठ लिपिक अनिल इंदुलकर, सेवक तानाजी मोहिते यांच्यासह विद्यार्थी – शिक्षक उपस्थित होते.



