महाराष्ट्र

महादेव मंदिरात प्रसादासाठी आलेल्या भाविकास पुजाऱ्याची धक्काबुक्की करून शिवीगाळ..

वेळापूर प्रतिनिधी आण्णा बनसोडे मो.नं.:-7020344359

वेळापूर ता. माळशिरस येथील अर्धनारी नटेश्वर मंदिरात सोमवार दिनांक 25 डिसेंबर रोजी रात्री आठच्या सुमारास हरीश मेटकरी रा. वेळापूर हे आपल्या लहान मुलीसोबत देव दर्शनासाठी आले होते, दर्शन घेतल्यानंतर ते आपल्या मुलीसोबत प्रसाद घेण्यासाठी गेले, प्रसाद घेतल्या नंतर ताट स्वतः धुवून ते ठेवण्यासाठी गेले असता तेथे असणारा रणवरे नावाच्या स्वयंसेवकाने त्यांना “ए ताट व्यवस्थित धुवून ठेव” अशी उद्धट भाषा वापरली.

पेशाने शिक्षक असणाऱ्या हरीश मेटकरी यांनी ” अरे बाळा व्यवस्थित बोल, मी तुझ्यापेक्षा मोठा आहे ” आणि त्यांनी पुन्हा ताट उचलून ते स्वतःच्या रुमालाने पुसायला घेतले, त्यांच्यात सुरू असलेली बाचाबाची पाहून मंदिराचे मुख्य पुजारी गौरीहार गुरव हे आपल्या रवि गुरव आणि सतीश गुरव या दोन मुलांसोबत तिथं आले आणि मेटकरी यांना ” काय रे फुकटचे खायला येता ते येता, ताट तरी नीट धुवून ठेवा ” असं म्हणाले, यावर पुन्हा हरीश मेटकरी आणि त्या तिघांमध्ये वादावादी सुरू झाली आणि पुजारी गौरिहार गुरव आणि त्यांच्या दोन मुलांनी हरीश मेटकरी यांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ करत मंदिरातून बाहेर ढकलून काढले.

सदर प्रकार घडल्यानंतर हरीश मेटकरी यांनी गावातील नेतेमंडळी, प्रतिष्ठित नागरिक आणि ट्रस्टच्या अध्यक्षांना घडलेला प्रकार फोन वरती सांगितला. या अगोदर सुध्दा मंदिरात येणाऱ्या भविकांसोबत असे प्रकार घडले आहेत, कायम उद्धटपणाची आणि अरेरावीची भाषा पुजाऱ्याकडून भाविकांना वापरली जात असल्याने वेळापूर येथील ग्रामस्थ आणि बाहेर गावातून येणारे भाविक यांच्या मधे नाराजीचा सुर पाहायला मिळत आहे. एका शिक्षक व्यक्तीला जर हे पुजारी अशी वागणूक देत असतील तर मंदिरात येणाऱ्या अशिक्षित भविकांशी तर कसे वागत असतील याची चर्चा वेळापूर ग्रामस्थ करताना दिसत आहेत. सदर पुजाऱ्यांवर महादेव देवालय ट्रस्टने लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी हरीश मेटकरी यांनी टाईम्स 9 मराठीशी बोलताना सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button