मुंबई ग्रँड रोड येथे वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या सहा आरोपी विरुद्ध पिटा कायद्याअंतर्गत पोलीस निरीक्षक लक्ष्मीकांत साळुंखे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज प्रजापती यांनी केली कारवाई.

प्रतिनिधी विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक 7030516640.
मुंबई ग्रँड रोड येथे एका बांगलादेशी आणि सहा भारतीय महिलांकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करून घेणाऱ्या तीन आरोपींना पिटा कायद्याअंतर्गत जेरबंद करण्यात मुंबई प्रभारी पोलीस निरीक्षक लक्ष्मीकांत साळुंखे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज प्रजापती व अनैतिक व्यापार प्रतिबंधक कक्षाच्या पोलीस निरीक्षक अनिता कदम यांच्या पथकाला यश आले असून अन्य तीन आरोपींचा पोलीस कसून शोध घेत आहेत.
ग्रँड रोड मुंबई येथे एका बिल्डिंगच्या तळमजल्या खाली वेश्या व्यवसाय चालत असल्याची गोपनीय माहिती मुंबई पोलीस सह आयुक्त गुन्हे शाखा यांना प्राप्त झाली होती या अनुषंगाने मंगळवार दिनांक 25 जुलै 2023 रोजी घटनास्थळी एक पंच आणि एक बनावट ग्राहक पाठवल्यावर या ठिकाणी एक बांगलादेशी महिला आणि सहा भारतीय महिला यांच्याकडून 1)टी मरीयम्मा उर्फ भानू वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या जागेचे मालक,2) राजदेव यादव उर्फ छोटू यादव,3) हुसेन,4) किशोर 5)रोमा आणि एक अनोळखी इसम हे सर्वजण या महिलांकडून वेश्या व्यवसाय चालवत आहेत अशी सत्यता आढळून आली असून यापैकी घटनास्थळी वेश्या व्यवसाय चालवणारा एक मॅनेजर व दोन दलाल यांच्यासह सात पीडित महिलाना पोलिसांनी ताब्यात घेतले असून यापैकी एका बांगलादेशी महिलेला दीड लाखांमध्ये विकत आणून तिच्याकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करून घेत असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली आहे.
यावरून कक्ष 8 गुन्हे शाखा मुंबई प्रभारी पोलीस निरीक्षक लक्ष्मीकांत साळुंखे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज प्रजापती, सह पथक तसेच अनैतिक व्यापार प्रतिबंधक कक्षाच्या पोलीस निरीक्षक अनिता कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक कानडे, पोलीस उपनिरीक्षक कन्हेरकर व पथक यांनी ही पिटा कायद्याअंतर्गत कारवाई करून तीन आरोपींना जेर बंद केले आहे. तर अन्य तीन आरोपींचा मुंबई पोलीस कसून शोध घेत आहेत.



