माळीनगर येथे कृषि कन्या कडून कृष्णजन्माष्टमी कार्यक्रमाचे आयोजन

प्रतिनिधी…रियाज मुलाणी मो.9921500780
माळीनगर येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्नित रत्नाई कृषी महाविद्यालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम २०२३-२४ अंतर्गत सासवड माळी एज्युकेशन सोसायटी गुलमोहर इंग्लिश मिडीयम स्कूल येथे कृष्णजन्माष्टमी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी दहीहंडी फोडून , विविध कार्यक्रम राबवून आनंद साजरा केला .

अकलूज येथील शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संग्राम सिंह मोहिते पाटील रत्नाई कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य आर. जी. नलावडे, कार्यक्रम समन्वयक प्रा. एस.एम एकतपुरे, प्रोग्राम ऑफिसर प्रा. एम. एम. चंदनकर आणि प्रा. एच. व्ही. कल्याणी यांच्या मार्गदर्शनानुसार कृषिकन्या भाग्यश्री कदम, आकांक्षा मोरे, लक्ष्मी कोरे, श्वेता भडांगे, रोहिणी गोलेकर, मेघना मोरे, प्रशाली पवार, अंकिता भोगवडे, प्रणाली देशमुख यांनी . यावेळी स्कूल चे प्रिन्सपल वसंत आंबोडकर, कृषिकन्या, शाळेचे विद्यार्थी व माळीनगर मधील ग्रामस्थ उपस्थित होते.



