महाराष्ट्र

आयडियल आयुर्वेद महाविद्यालय पोशेरी, वाडा येथे आयुर्वेद जनजागृती अभियानांतर्गत रॕलीचे आयोजन

(ठाणे प्रतिनिधी) राजेंद्र भगवान भोईर (मो.९०२८३०५३१९)
टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण विभाग व आयुष संचालनालय निर्देशित आयुर्वेद जनजागृती अभियानांतर्गत पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील पोशेरी येथील आयडियल आयुर्वेद महाविद्यालया तर्फे जनजागृती रॅली चे आयोजन करण्यात आले होते. प्रथम व द्वितीय बी.ए.एम.एस. च्या विद्यार्थ्यांनी विविध पोस्टर व घोषणांच्या माध्यमातून रॅली द्वारे आयुर्वेद चा प्रसार केला.

दि.२२ नोव्हेंबर ते दि.३० नोव्हेंबर २०२३ या कालावधीत आयुर्वेद महाविद्यालयाद्वारे आयोजित व्याख्यानमाला सांगता स्वरूपात सदर रॅली चे आयोजन करण्यात आले होते. वैद्य श्रेयस गडग, वैद्य. साईबन्ना म्हसणे, वैद्य. वैभवी भवर, वैद्य. प्रचिती पाटील यांनी वाडा तालुक्यातील विविध ठिकाणी आयोजित आरोग्य शिबिरांतर्गत गुदगत विकार, पंचकर्म, स्वास्थ्य रक्षण व गर्भिणी परिचर्या या बद्दल जनजागृती केली.

रचना शरीर विभागातील वैद्य. ज्योती मोरे, वैद्य. कोमल दळवी, क्रिया शरीर विभागातील वैद्य. प्रणया गडकरी, वैद्य. सायली वाघुळदे. वैद्य. हितेश्वर लोणेरे, संहिता विभागातील वैद्य. प्राची तावडे, द्रव्यगुण विभागातील वैद्या रेखा खाडे, वैद्य. कल्याणी सकपाळ, रसशास्त्र विभागातील वैद्य.अमित फिरके, रोग निदान विभागातील वैद्य. अक्षता पाटील व अगदतंत्र विभागातील वैद्य. सुमित मराठे यांनी या व्याख्यानमालेतंर्गत शालेय विद्यार्थी, नर्सिंग कॉलेज व फार्मसी कॉलेज चे विद्यार्थी यांना आयुर्वेद विषय सर्वांगीण माहिती देवून आयुर्वेदाचें महत्व पटवुन दिले.

हा सर्व कार्यक्रम यशस्वी करण्याचे काम संस्थेचे विश्वस्त श्री.अभिषेक जैन यांचे मोलाचे सहकार्य लाभले. नोडल अधिकारी वैद्य. रेखा खाडे यांनी सर्व कार्यक्रमात समन्वयकची भूमिका पार पडली. कॉलेजच्या प्राचार्य वैद्य. संजीवनी डाबरे यांच्या बहुमुल्य मार्गदर्शनामुळे कार्यक्रम यशस्वीपणे झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button