पालघर वाहतूक शाखेकडून दीड महिन्यात 4 हजार 285 वाहन चालकांवर कारवाई
टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक -7030516640.
पालघर जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखा पालघर तर्फे 1 ऑक्टोबर ते 16 नोव्हेंबर 2023 या कालावधीत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहतूक चालकांवर दीड महिन्यात कारवाईचा बडगा उगारला होता यामध्ये 18 लाख 25 हजार 150 रुपयाच्या विक्रमी दंड वाहतूक शाखेकडून दंडाच्या स्वरूपात वसूल करण्यात आला आहे.त्याचबरोबर ड्रिंक अँड ड्राईव्हच्या 49 केसेस दाखल करण्यात आल्या आहेत.
वाहनांच्या अपघातात पालघर जिल्ह्यांमध्ये अनेक जणांना जीव गमवावे लागले आहेत.या दृष्टीने वाहतूक शाखेने भरधाव वेगाने वाहन चालवणाऱ्या वाहन चालकांना शिस्त लागावी या दृष्टीने ठिकठिकाणी तपासणी नाके उभारून चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. ड्रिंक्स अँड ड्राईव्ह अन्वये 49 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. पार्टीमध्ये मद्यपान केले जाते त्यानंतर घरी परतताना गाडी चालवून ड्रिंक अँड ड्राईव्हच्या नियमाचे उल्लंघन केले जाते स्वतःसह इतरांच्या जीवासाठीही धोकादायक असते पालघर जिल्ह्यातही ड्रिंक अँड ड्राइव्ह चे नियम आहेत याची खबरदारी वाहन चालकांना यापुढे घ्यावी लागणार आहे.
वाहतूक शाखेतर्फे करण्यात आलेल्या कारवाईत तीन चाकी रिक्षा, डम डम, इको मॅजिक, काळी पिवळी टॅक्सी चालकांविरुद्ध विशेष मोहिम राबवूनअवैध प्रवासी वाहतूक (६६/१९२) अतिरिक्त प्रवासी वाहतूक (१९४ A) प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई २५ ऑक्टोंबर ते 16 नोव्हेंब 2023 त्या कालावधीत करण्यात आली आहे. तसेच वाहन चालकांकडून दोन लाख 55 हजार 100 रुपयाचा दंड देखील वसूल करण्यात आल्याचे वाहतूक शाखेकडून सांगण्यात आले
दीड महिन्याच्या कालावधीत 4 हजार 285 वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे यामध्ये 3 हजार 355 जणांनी दहा लाख 65 हजार 900 रुपये दंडाची रक्कम भरली आहे. 856 वाहन चालकांकडून पाच लाख चार हजार एकशे पन्नास रुपये दंडाची रक्कम वसूल करायची बाकी आहे तर 74 जणांवर
न्यायालयात केसेस दाखल करण्यात आले आहे त्याचबरोबर अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या 15 वाहन चालकांवर कारवाई करण्यात येऊन त्यांच्यावर कोर्टात केस दाखल करण्यात आले आहेत. अशी माहिती वाहतूक शाखेचे प्रभारी अधिकारी आसिफ बेग यांनी दिली