नालासोपाऱ्यात बाप आणि मुलीच्या नात्याला कलंक.. स्वतःच्या मुलीवर केला बलात्कार…आईच्या तक्रारीवरून नालासोपारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
टाईम्स, 9 मराठी न्युज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक-7030516640
नालासोपाऱ्यात एका नराधम बापाने स्वत:च्या २२ वर्षीय मुलीवर लैंगिक व शारिरीक अत्याचार करत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
नराधम बाप या मुलीला घरात डांबून सतत तिला मारहाण करून बलात्कार करत होता. पीडित मुलगी क्षयरोगाने आजारी असतानाही हे अत्याचार सुरू होते. मुलीच्या मृत्यूनंतर तिच्या आईने धाडस करून पोलिसांत तक्रार दिल्यानंतर नालासोपारा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पीडित तरुणी ही २२ वर्षांची असून ती नालासोपारा पश्चिम येथे रहात होती. मागील ३ महिन्यांपासून ती क्षयरोगाने आजारी होती. तिला ११ नोव्हेंबर रोजी मुंबईच्या जेजे रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु उपचार सुरू असताना तिचादुर्दैवी मृत्यू झाला. तिच्या मृत्यूनंतर मात्र तिच्यावरील अत्याचाराला वाचा फुटली आहे. पीडित मुलीचे ५४ वर्षीय वडीलच तिच्यावर बलात्कार करून शारिरीक छळ करत असल्याची तक्रार तिच्या आईने नालासोपारा पोलिस ठाण्यात दिली आहे.
पीडित मुलीवर सतत तिचे वडील बलात्कार करत होते. या प्रकाराची कुठे वाच्यता केल्यास ठार मारण्याची धमकी देत होते. मुलीला तो बळजबरीने घरात डांबून ठेवत होता. त्यामुळे पीडित आणि तिची आई भीतीपोटी गप्प रहात होते. हे प्रकार सातत्याने वाढत होते. आरोपी पिता मुलीला मारहाण करत होता. दरम्यान च्या काळात मुलगी गर्भवती झाली होती. त्यावेळी तिचा आरोपी पित्याने बळजबरीने गर्भपातही केला होता. अशी माहिती तिच्या आईने पोलिसांना दिली आहे.
दरम्यान पीडित तरुणीला क्षयरोगाची लागण झाल्यानंतरही पित्याचे अत्याचार सुरू होते. मुलीच्या मृत्यूनंतर आईने पोलिसात तक्रार करण्याचे धाडस दाखवले. तिच्या आईच्या तक्रारीवरून
नालासोपारा पोलिसांनी आरोपी बापा विरोधात कलम ३७६ (एन), ३५४ (अ) तसते ३४२, ३२२, ३२३, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पित्याच्या मारहाण आणि शारिरीक अत्याचारामुळेच मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या आईने केला आहे