मानव अधिकार,पत्रकार संरक्षण व माहिती अधिकार समितीच्या कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष पदी निलोफर बागवान यांची निवड…
आमीर मोहोळकर
टाइम्स 9 न्यूज,अकलूज
9890299499
कोल्हापूर येथील समाज सेविका सौ निलोफर बागवान यांची मानव अधिकार,पत्रकार संरक्षण व माहिती अधिकार समितीच्या कोल्हापूर जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्ष पदी निवड झाल्याची माहिती संघटनेचे प्रदेश अध्यक्ष आदम बागवान यांनी दिली…
पुढे बोलताना ते असे म्हणाले की, निलोफर बागवान यांची निवड हि संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अशपाक शेख (सर) आणि राष्ट्रीय सचिव सुबोध वाघमोडे यांच्या शिफारशी नुसार झाल्याचे हि आदम बागवान यांनी सांगितले…
अशपाक शेख सर यांच्या नेतृत्वाखाली संघटनेने आत्ता पर्यंत उत्तुंग असे कार्य केले असून भविष्यात सबंध महाराष्ट्रात संघटना आणखी जोमाने काम करणार असल्याचे हि त्यांनी सांगितले…

कोल्हापूर येथील सामाजिक चळवळीत तसेच राजकीय क्षेत्रात अल्पवाधितच आपल्या कामाचा ठसा उमटवणाऱ्या निलोफर बागवान यांच्या या निवडीने चळवळीत आनंदाचे वातावरण पसरले आहे…
या वेळी मानव अधिकार,पत्रकार संरक्षण व माहिती अधिकार समिती या संघटनेचे जे के बागवान,आसिफ बागवान (बन्सीलाल),हरिदास नरखेडकर यांच्या सह बहुतांश पदाधिकारी उपस्थित होते…



