कारंदवाडीचे नवनिर्वाचित थेट लोकनियुक्त सरपंच व सर्व सदस्यांचा पहिला सत्कार बागणी जिल्हा परिषद मतदार संघातील मर्दवाडी गावातून सुरुवात

सांगली जिल्हा प्रतिनिधी : आनंद सावंत, टाईम्स 9 मराठी न्यूज रिपोर्टर, मो. 8007932121
सांगली : जनशक्ती परिवर्तन पॅनल कारंदवाडी चे लोकनियुक्त सरपंच व सर्व सदस्यांचा पहिला सत्काराला बागणी जिल्हा परिषद मतदार संघातील मर्दवाडी गावातून सुरुवात झाली.. मर्दवाडी येथील विश्वास पाटील बापूसाहेब वाघमारे, प्रकाश साळुंखे, संभाजी पाटील, अमोल पाटील, किरण पाटील, सतपाल देशमुख, विराज खर्डेकर सरकार,दीपक पाटील, गजानन सपकाळ ,शिवराज पाटील, इत्यादी मान्यवरांनी या सत्काराचे नियोजन गावातील भर चौकातच घेतले. या सत्कार प्रसंगी युवा नेते सागर खोत, जनशक्ती परिवर्तन पॅनल प्रमुख संदीप सावंत, प्रशांत पाटील, सचिन सावंत, शंकर हाके,सदाशिव यादव, अनिल सरदेशमुख, माणिक पाटील, दिनकर सरदेशमुख,इत्यादी अनेकजण उपस्थित होते..
मर्दवाडी येथील सर्व कार्यकर्त्यांनी कारंदवाडीकरांचा पहिला सत्कार चौकामध्येच घेऊन फटाक्यांची आतिषबाजी करत उस्फुर्त स्वागत केले स्वागत व प्रस्तावना ज्येष्ठ मार्गदर्शक पांडुरंग पाटील यांनी केले याप्रसंगी बोलताना भाजपा वाळवा तालुका अध्यक्ष निवास पाटील म्हणाले की गेल्या 20 ते 25 वर्षांमध्ये वेगळ्या पद्धतीचे राजकारण व अनेक लोकांना त्रास देण्याचे काम काही व्यक्तींनी केला परंतु त्याचा उद्रेक या कारंदवाडीच्या निवडणुकीतून दिसून आला. निशिकांत दादा भोसले पाटील यांच्या माध्यमातून लागेल ते सहकार्य व लागेल तेवढा निधी आम्ही कारंदवाडीकरांना देऊ असे देखील आश्वासन निवास पाटील यांनी दिले…

आपले मनोगत व्यक्त करताना सचिन सावंत म्हणाले की हा विजय स्वर्गीय विलासराव शिंदे साहेब, स्व.तुकाराम हाके (अण्णा) व स्व.अरुण(आप्पा) पाटील यांना समर्पित.. गेल्या 20 ते 22 वर्षापासून जय पराजयाचा विचार न करता अविरतपणे जनतेची कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील राहिलो व त्याच वेळी आम्ही आजच्या परिवर्तनाचा पाया घातला, कोणत्या एका व्यक्तीला, पक्षाला विरोध नसून हा प्रवृत्तीला विरोध आहे म्हणून आज हिम्मत पाटील यांच्या रूपाने एक युवा व आश्वासक चेहरा कारंदवाडी करांच्या पसंतीस उतरला यापुढे आम्ही सर्वजण एकत्रित मिळून केंद्र शासनाच्या राज्य शासनाच्या नाविन्यपूर्ण विविध योजना प्रभावीपणे राबवणार असून विशेषता महिला व युवकांसाठी काम करण्याचा मानस आहे,
या विजयाचे शिल्पकार व रूपालीताई हाके, विकास हाके, राजेंद्र घबाडे,नरेंद्र हाके, विजय हाके, कमलाकर हाके, प्रमोद नाईक, लखन कोळी, दिगंबर ठाणेकर इत्यादी अनेक प्रमुखांचे योगदान आम्हाला विसरता येणार नाही.. युवा नेते सागरभाऊ खोत आपल्या मनोगतामध्ये बोलताना म्हणाले की नावाप्रमाणेच हिम्मतवाला स्वभाव असलेले सरपंच कारंदवाडी गावाने दिला आहे, कारंदवाडी गावच्या अनेक वर्षानंतर सत्तांतर झाले सर्व पदे स्वतःकडेच पाहिजेत या प्रवृत्तीला गावकऱ्यांनी थांबवून इतिहास घडवला याबद्दल सर्व कारंदवाडी गावच्या जनतेचे अभिनंदन.. या पुढच्या काळात आपण गावांमध्ये चांगले काम करावे यासाठी शुभेच्छा दिल्या. सांगली जिल्हा भाजपा अध्यक्ष निशिकांत दादा भोसले पाटील व माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या माध्यमातून लागेल तो निधी महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून आम्ही आपल्याला देण्यासाठी प्रयत्नशील राहू असेही म्हणाले..

या पहिल्याच सत्काराला उत्तर देताना कारंदवाडीचे थेट लोकनियुक्त सरपंच हिम्मत पाटील म्हणाले की कारंदवाडी गावामध्ये दिलेल्या दहा वर्षापासून युवकांचे संघटन केले, जनतेचे प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टीने प्रामाणिक प्रयत्न केले मग तो कोणत्या पार्टीचा आहे न बघता त्याचे काम झाले पाहिजे ही स्पष्ट भूमिका आमचे वडील स्वर्गीय आप्पा यांनी दिलेल्या शिकवणीप्रमाणे सर्वांचे काम करण्याच्या दृष्टीने अत्यंत प्रामाणिक प्रयत्न केले ,आजपर्यंत व इथून पुढच्या काळात देखील अशाच पद्धतीचे काम आमचे असेल. नवीन जबाबदारी पेलत असताना सर्वांना सोबत घेऊन जाऊन काम करणे हे नवीन आवाहन यशस्वीपणे पेलून सर्वांना समान न्याय देण्याची भूमिका आमच्या जनशक्ती परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून होईल.. तालुक्यातील या पहिल्याच सत्कारासाठी मी सर्व मर्दवाडी येथील जनतेचा मनापासून आभारी आहे..
कारंदवाडी गावचे भाजपा अध्यक्ष सदाशिव यादव साहेब यांनी आभार व्यक्त करताना सर्व मर्दवाडीकरांचे प्रथमता आभार मानले की आपण हा पहिलाच कार्यक्रम आयोजित करून तालुक्यामध्ये सलोखा व एकोप्याचे दर्शन घडवले यासाठी जनशक्ती परिवर्तन पॅनलच्या वतीने सर्व कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त केले.. याप्रसंगी मर्दवाडी गावातील अनेक युवा, ज्येष्ठ व महिला मोठ्या संख्येने या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित होते..



