डहाणू चारोटी नाका सरकार दुकानात घरफोडी करणाऱ्या 3 आरोपींना मुद्देमालासह जेरबंद करण्यात कासा पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर यांच्या पथकाला यश

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक _7030516640.
पालघर जिल्ह्यातील डहाणू चारोटी नाका येथील मोबाईलच्या दुकानाचे शटर व दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरे तोडून या दुकानातील 14,500 रुपये किमतीचे मोबाईल चोरी करणाऱ्या डहाणू सावटा येथील 3 आरोपींना मुद्देमालासह जेरबंद करण्यात कासा पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर यांच्या पथकाला बुधवारी यश आले आहे. हे तिन्ही आरोपी कासा पोलीस ठाण्यात जेरबंद आहेत.
डहाणू कासा पोलीस ठाणे हद्दीतील चारोटी नाका येथे रिजवान वारसी यांचे सरकार नावाचे मोबाईल विक्रीचे दुकान आहे. शनिवार दिनांक 4 नोव्हेंबर 2023 रोजी रात्री या दुकानाचे शटर तोडून या दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरे फोडून या दुकानातील 14,500 रुपये किमतीचे मोबाईल चोरी करून अज्ञात चोर फरार झाले होते. याबाबत अज्ञात इसमाविरुद्ध कासा पोलीस ठाण्यात 5 नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.या बाबीचे गांभीर्य लक्षात घेऊन पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी या आरोपींचा तपास करून त्यांना लवकरात लवकर जेरबंद करण्याचे आदेश कासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर यांना दिले होते.

या आदेशाची अंमलबजावणी करून अवघ्या तीन दिवसात या गुन्ह्यातील आरोपी वसीम अब्दुल हमीद अन्सारी वय वर्ष (21), समीर अन्सार खान वय वर्ष (18 ),आदिल ताज मोहम्मद शेख वय वर्ष(19) राहणार डहाणू सावटा-दुबलापाडा या तिघांना मुद्देमालासह बुधवार दिनांक 8 नोव्हेंबर 2023 रोजी कासा पोलीस ठाणे प्रभारी पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर, पोलीस उपनिरीक्षक संदीप नांगरे, पोलीस हवालदार बी.आर. धांगडा, सह कासा पोलीस ठाणे अंमलदार या पथकाने अटक करून या तिघांविरुद्ध कासा पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा नोंद करून त्यांना जेरबंद केले आहे. या गुन्ह्याबाबत अधिक तपास कासा पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप नांगरे करत आहेत.



