महाराष्ट्र
विक्रमगड ची विद्यार्थ्यानी कु.गौरी वि.सोनावणे हिची विभागीय कॕरम स्पर्धेसाठी निवड

(ठाणे प्रतिनिधी) राजेंद्र भगवान भोईर
टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क
(मो. ९०२८३०५६१९ )
पालघर जिल्ह्यातील बोईसर येथे मंगळवार दिनांक ०७ नोव्हेंबर २०२३ रोजी पार पडलेल्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे महाराष्ट्र राज्य आणि जिल्हा क्रीडा अधिकारी, पालघर आयोजित १४ वर्षाखालील मुलांसाठी व मुलींसाठी घेण्यात आलेली जिल्हास्तरीय शालेय कॅरम स्पर्धेत लिटिल एंन्जल स्कूल, विक्रमगड या शाळेमध्ये शिकणारी

संत रोहिदास नगर येथील विद्यार्थिनी कुमारी गौरी विलास सोनावणे हिने १४ वर्षा खालील वयोगटांमध्ये कॅरम स्पर्धेत व्दितीय क्रमांक पटकावला असून तिच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे विभागीय स्पर्धेसाठी तिची निवड करण्यात आली आहे. जिल्हास्तरीय शालेय कॕरम स्पर्धा ह्या जिल्हा क्रिडा अधिकारी पालघर तर्फे डॉन बॉस्को स्कूल , बोईसर येथे आयोजित करण्यात आल्या होत्या .



