शहर

सोलापूर जिल्ह्यात संताच्या पालखी सोहळा आगमनास पोलिस यंत्रणा सज्ज…

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क

श्री ज्ञानेश्वर माऊलींची व जगत गुरू संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालख्यांसह अनेक संतांच्या पालखी सोहळ्याचे आगमन सोलापूर जिल्ह्यात होत असल्यामुळे पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे…

12/07/2024 रोजी सकाळी अकलुज पोलीस ठाणे हद्दीत श्री संत जगतगुरु तुकाराम महाराज पालखीचे आगमन होत असून सदाशिवराव माने विदयालय येथे गोल रिंगण व मुक्काम आहे 13/07/2024 रोजी सकाळी माळीनगर येथे उभे रिंगण व बोरगांव मुक्काम आहे.

तसेच सदर पालखी सोहळयाकरीता पोलीस प्रशासनातर्फे अकलुज पोलीस ठाणे हद्दीत एकुण पोलीस अधिकारी 30 (त्यात अपर पोलीस अधीक्षक – 1, पोलीस उपअधीक्षक – 2, पोलीस निरीक्षक – 6, सहाय्यक पोलीस निरीक्षक/पोलीस उपनिरीक्षक – 20, महिला पोलीस उपनिरीक्षक – 2), पुरुष अंमलदार – 325, महिला पोलीस अंमलदार – 20, पुरुष होमगार्ड – 215, महिला होमगार्ड – 60 असा एकुण 650 पोलीस बंदोबस्त, 1 एस.आर.पी.एफ. प्लाटून, 1 बी.डी.डी.एस. पथक, 1 मिसींग सेल पथक, 1 नियंत्रण कक्ष, गुन्हे प्रकटीकरण शाखा पथक, तपास पथक अशी पथके तैनात केली आहेत.

तसेच महाविद्यलयीन एन.एस.एस. व एन.सी.सी. चे विदयार्थी तसेच पोलीस पाटील व पोलीस मित्र,ग्रामरक्षकदल यांचाही सहभाग आहे. वाहतुक सुरळीत राहण्याकरीता पोलीस अधीक्षक सोा यांनी यापुर्वीच जाहीरनामा प्रसिध्द केलेला असून वाहतुक कर्मचारी नेमण्यात आलेले असून बॅरिकेटींगची व्यवस्था केलेली आहे.सदरचा पालखी सोहळयामध्ये भाविकांना दर्शनाचा लाभ घेण्याकरीता चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.पालखी सोहळा शांततामय वातावरणात संपन्न व्हावा तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये याकरीता पोलीस यंत्रणा सज्ज झालेली आहे अशी माहिती अकलूज पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे यांनी दिली…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button