शहर

लोकनायक जयप्रकाश विद्यालय आगरवाडी येथे गॅलेक्सी कंपनीचे प्रमुख अधिकारी योगेश ठाकूर आणि चिंतामण ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न

टाईम्स 9मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक-7030516640.

पालघर जिल्ह्यातील सफाळे आगरवाडी येथील लोकनायक जयप्रकाश नारायण विद्यालयात 7 नवीन वर्ग खोल्यांच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम बोईसर तारापूर एमआयडीसी गॅलेक्सी कंपनीचे प्रमुख अधिकारी योगेश ठाकूर आणि आगरवाडी संस्थेचे कार्याध्यक्ष चिंतामण ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी पार पडला.

पालघर जिल्ह्यातील बोईसर तारापूर एमआयडीसी मधील गॅलेक्सी या कंपनीने सामाजिक जबाबदारी निधी (सी.एस.आर )अंतर्गत ग्रामीण विद्या विकास वर्धिनी मंडळ आगरवाडी शैक्षणिक संस्थेच्या लोकनायक जयप्रकाश नारायण विद्यालयात 7 नवीन वर्ग खोल्या बांधण्यासाठी 35 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.

या सात नवीन वर्ग खोल्या बांधण्यासाठी एकूण खर्च 70 लाख रुपयांच्या निधीची आवश्यकता असून उर्वरित 35 लाख रुपयांचा निधी देणगीदार व वर्गणी स्वरूपात येणाऱ्या मदत निधीतून करण्यात येणार आहे. या भूमिपूजनाचा कार्यक्रम शनिवार दिनांक 04 नोव्हेंबर 2023 रोजी लोकनायक जयप्रकाश नारायण विद्यालय आगरवाडी येथे पार पडला.

या 7 वर्ग खोल्यांच्या बांधकाम भूमिपूजनाच्या प्रसंगी बोईसर तारापूर एमआयडीसी गॅलेक्सी कंपनीचे प्रमुख अधिकारी योगेश ठाकूर,मिलिंद पाटील, खटाव सर, सचिन गावड, व लोकनायक जयप्रकाश नारायण विद्यालय आगरवाडी संस्थेचे अध्यक्ष राजाराम म्हात्रे,विश्वस्त जगन्नाथ वर्तक, कार्याध्यक्ष चिंतामण ठाकूर, कार्यवाह विश्वनाथ, पाटील, सौ. विदुला पाटील व या संस्थेचे कार्यकारणी सदस्य व शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button