पालघर जिल्ह्यातील जव्हार येथे कुस्त्यांचे जंगी सामने संपन्न

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक. 7030516640
पालघर जिल्ह्यातील जव्हार शहरात बुधवार दिनांक २५ ऑक्टोबर २०२३ रोजी जव्हार नगर परिषद व ग्रामस्थांच्या सहकार्याने कुस्त्यांचे जंगी सामने जुना राजवाड्यामध्ये पार पडले
संस्थान काळापासून जव्हारचा दरबारी दसरा साजरा होत असून दरबारी दसरा झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी जुना राजवाडा येथे कुस्त्यांच्या भव्य सामन्यांचे आयोजन करण्यात येते.
या कुस्त्यांचे सामने पाहण्यासाठी संपूर्ण पालघर जिल्ह्यातून हौशी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कुस्त्यांचे सामने खेळण्यासाठी नाशिक, शिर्डी, मनमाड नगर,ऒरंगाबाद, भिवंडी, चाळीसगाव व जव्हार ,मोखाडा भागातून या पैलवान आले होते . जव्हार नगरपरिषद व नागरिकांच्या सहभागातून कुस्ती पैलवानांना रोख रक्कमा बक्षीस म्हणून देण्यात आल्या. या कार्यक्रमात एकूण २५० कुस्त्या खेळविण्यात आल्या. साधारण १००० हजार ३००० हजार व पुढे ५००० हजारापर्यंत कुस्ती पैलवानांना रोख रकमा व प्रमाणपत्र देण्यात आले.
या कुस्त्यांनध्ये भाऊसाहेब मार्तंड,मुकेश पवार ,निशांत बागुल,किरण पवार,गौरव यादव,मनोज भांगरे, रमजान पठाण,अली शहा ,देविदास टेनकर योगेश आयरे, संदिप पाटील,अजय गवळी या नावाजलेल्या पहिलवानांनी कुस्त्यांखेळुन आपले कसब दाखविले. शेवटच्या दोन कुस्त्या भाऊसाहेब मार्तंड मालेगाव व निशांत बागुल त्रंबकेश्वर यांच्यात झाली. या मध्ये निशांत बागुल विजयी झाले तर शेवटची कुस्ती मुकेश पवार चाळीसगाव व भाऊसाहेब मार्तंड यांच्यात झाली
या मध्ये मुकेश पवार विजयी झाले या विजयी पैहेलवानांना कुस्तीसमीतीचे सभापती निलेश घोलप, उपसभापती इक्बाल कोतवाल,माजी नगरसेवक विजय घोलप यांच्या हस्ते रोख पारितोषिक ५००० रुपये,शाल , श्रीफळ व चषक देण्यात आले या कुस्त्यांचे पंच म्हणून अनंता घोलप, विवेक शिरसाट, इक्बाल कोतवाल, संजय वनमाळी, सुनील ठमके, डहाळे बुवा,निवॄत्ती बेनके,त्रिंबक बेनके,नरेश महाले,नविन घोलप यांनी काम पाहिले तर कुस्त्यांच्या कार्यक्रमाचे समालोचन मनीष घोलप यांनी केले.
सर्व पंचांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन नगर पालीकेचे सभा अधिक्षक उत्तम शेवाळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.तसेच जव्हारचे युवराज मार्तंडराव मुकणे यांचा देखील सत्कार सभापतीच्या हस्ते करण्यात आला.हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी नगरपालिकेचे कर्मचारी उत्तम शेवाळे, नरेश भोईर, मनोज प्रभु कल्पेश गारे,मुद्दतसर मुल्ला,पंढरी बेनके,रमेश भरसट यांनी विशेष परिश्रम घेतले.



