अकलूज येथील नागपंचमी सणा निमित्त “गुळ शेंगदाना” कार्यक्रम…

✅ अनेक वर्षांची परंपरा मोहिते पाटील परिवार आपुलकीने जपत आहे…
विशेष प्रतिनिधी,टाइम्स 9 न्यूज,अकलूज
9890299499
29/7/2025 रोजी वार मंगळवार नांगपंचमी सणानिमित्त अकलूज येथील दळवी परिवाराच्या वतीने सालाबाद प्रमाणे “गुळ शेंगदाणा” कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता…
आजच्या या कार्यक्रमासाठी युवा नेतृत्व सयाजीराजे संग्रामसिंह मोहिते पाटील उपस्थित होते,नागपंचमी सणानिमित्त पूर्वीच्या काळी कै सहकार महर्षी शंकरराव नारायणराव मोहिते पाटील साहेब जुना बाजारतळ या ठिकाणी आपल्या सवंगडया समवेत “सुरपाट” खेळत असत आणि नंतर दळवी यांच्या दुकानामध्ये गुळ शेंगदाण्याचा आस्वाद घेत असत…

आज देखील तीच परंपरा माळशिरस तालुक्याचे “किंग मेकर” जयसिंह शंकरराव मोहिते पाटील तथा बाळदादा तसेच संग्रामसिंह जयसिंह मोहिते पाटील आणि युवा नेते सयाजीराजे संग्रामसिंह मोहिते पाटील यांनी जोपासली असल्याचे पहायला मिळाले…
आज या “गुळ शेंगदाना” कार्यक्रमाच्या निमित्ताने युवा नेतृत्व सयाजीराजे मोहिते पाटील यांचा सत्कार दळवी परिवाराच्या वतीने रणजीत दळवी (आर डी) यांच्या हस्ते करण्यात आला.याप्रसंगी विविध संस्थांचे पदाधिकारी,ज्येष्ठ नागरिक,युवा कार्यकर्ते उपस्थित होते…



