शहर

सफाळे पोलीस ठाणे इन्चार्ज पदी सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता.के शेळके यांची नियुक्ती…तर पोलीस निरीक्षक अविनाश मांदळे यांची कासा पोलीस ठाणे येथे बदली

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक -7030516640

पालघर जिल्ह्यातील केळवा सागरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दत्ता.के. शेळके यांची शुक्रवार दिनांक 16 ऑगस्ट 2024 पासून सफाळे पोलीस ठाणे येथे नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी शुक्रवारी संध्याकाळी सफाळे पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला आहे .

तर या आधीचे सफाळे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अविनाश मांदले यांची बदली डहाणू तालुक्यातील कासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर यांच्या जागी कासा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

विधानसभा सार्वत्रिक निवडणुका 2024 च्या अनुषंगाने प्रशासकीय कारणास्तव पालघर जिल्ह्यातील पोलीस निरीक्षकांच्या या बदल्या करण्यात आल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button