तलासरी येथील 10 वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिचा खून करणाऱ्या नराधमाच्या अवघ्या दोन तासात तपास करून पोलीस निरीक्षक अजय वसावे यांच्या पथकाने आवळल्या मुसक्या

पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक.7030516640. पालघर जिल्हा वृत्तांत
पालघर माहीम येथील सामूहिक बलात्काराची घटना ताजी असताना तलासरी येथील एका 45 वर्षीय नराधमाने शाळेत जाणाऱ्या 10 वर्षीय मुलीला पळवून घेऊन जाऊन तिच्यावर बलात्कार करून तिचा खून केला आहे. बुधवार दिनांक 1 मार्च 2023 रोजी सकाळी 9.00 वाजता तलासरी येथील 10 वर्षीय मुलगी शाळेत गेली ती परत आलीच नाही म्हणून तिच्या वडिलांनी तलासरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय वसावे यांच्याकडे तक्रार दाखल केली होती.

या तक्रारीबाबत पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील व अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज शिरसाठ यांच्या आदेशान्वे उपविभागीय पोलीस अधिकारी संजीव पिंपळे यांच्या मार्गदर्शनाखाली तलासरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय वसावे यांना वेगवेगळी पथके तयार करून तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या या सूचनांचे काटेकोरपणे पालन करून तांत्रिक पुराव्यांच्या आधारे कोणतेही धागेदोरे नसताना सखोल व कौशल्यपूर्ण तपास करून पोलीस निरीक्षक अजय वसावे यांच्या पथकाने
अवघ्या दोन तासात (45)वर्षीय रमेश दुबला या नराधमाला अटक करून त्याची अधिक चौकशी केली असता त्याने या मुलीला पळवून घेऊन जाऊन गुजरात राज्यात तिच्यावर बलात्कार करून खून केल्याची कबुली दिली आहे. ही यशस्वी कारवाई पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज शिरसाठ यांच्या आदेशान्वे उपविभागीय पोलीस अधिकारी संजीव पिंपळे यांच्या मार्गदर्शनाखाली तलासरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय वसावे, सहायक पोलीस निरीक्षक भरत पाटील, पोलीस उपनिरीक्षक उमेश रोठे, महिला पोलीस उपनिरीक्षक रिझवाना ककेरी, पोलीस उपनिरीक्षक समीर लोंढे, पोलीस उपनिरीक्षक भाऊ गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक हर्षद शेख व सर्व नेमणूक तलासरी पोलीस अंमलदार या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली आहे .



