महाराष्ट्र

महागाव नगर पंचायत मध्ये महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री जयंती साजरी

प्रतिनिधी मायाताई सागर पाईकराव यवतमाळ

महागाव:-राष्ट्रपिता महात्मा गांधी व स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांची जयंती महागाव नगर पंचायतमध्ये साजरी करण्यात आली.

अहिंसा व असहकाराचे मोठे अस्त्र देवुन स्वातंत्र्य मिळवुन देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी व जय जवान जय किसान नारा देत शेतकरी व भारतीय सैन्य दलाच्या कार्याचा गौरव करणारे स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांची जयंती निमित्त महागाव नगर पंचायत नगराध्यक्षा सौ.सुनंदा दिलीपराव कोपरकर यांच्या अध्यक्षतेमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी महागाव नगरपंचायतचे उपाध्यक्ष प्रमोद भरवाडे , महिला व बालकल्याण सभापती सौ.रूपाली संतोष कोल्हेकर , बांधकाम सभापती गजानन साबळे , आरोग्य सभापती विशाल पांडे ,काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा नगरसेवक संभाजीराव नरवाडे , काँग्रेसचे माजी उपनगराध्यक्ष तथा गटनेते शैलेश कोपरकर , नगरसेवक सुजितसिंह ठाकुर, नगरसेवक महेश पाटील , नगरसेविका सौ.सुरेखा विनोद कोपरकर ,

नगरसेविका सौ. सुनीता शिवाजीराव डाखोरे , नगरसेविका सौ.जयश्री अशोकराव इंगोले ,माजी नगराध्यक्षा नगरसेविका सौ. करुणा नारायण शिरबिरे ,नगरसेवक परवेज सुरैय्या, शंकर बावणे , महागाव नगरपंचायतच्या शहर समन्वयक पल्लवी रत्ने , नारायण शिरबिरे , शिवाजीराव डाखोरे , नगर पंचायत चे कर्मचारी अमोल गडबैले , शेख मोहसीन यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button