ईद-ए-मिलाद निमित्त अकलूज शहर पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना फळे वाटप

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
अखंड विश्वाला शांतता मानवता व समतेचा संदेश देणारे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त विश्वभरात बारा रब्बीउल अव्वल अर्थात ईद-ए-मिलाद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत असते

त्याचाच एक भाग म्हणून अकलूज शहर पीपल्स रिपब्लिकन पार्टी यांच्यावतीने उपजिल्हा रुग्णालय अकलूज येथील रुग्णांना फळे वाटप कार्यक्रम घेण्यात आला.

हा फळे वाटपाचा कार्यक्रम पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले माळशिरस तालुकाध्यक्ष हेमंत कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पीपल्स रिपब्लिकन पार्टी अकलूज शहर उपाध्यक्ष साजिद बागवान. नय्युम बागवान. युवक अध्यक्ष सचिन मोरे. शिवाजी खडतरे. राजू बागवान. यांच्या वतीने पत्रकार नौशाद मुलाणी पत्रकार मोहसीन शेख तनवीर भाई तांबोळी समीर काझी डॉक्टर मिसाळ. डॉक्टर खडतरे यांच्या प्रमुख उपस्थितीत फळे वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला.

यावेळी इम्रान बागवान. जुबेर बागवान. मेहबूब तांबोळी. वाहीद बागवान. सोयब बागवान. सोहेल बागवान. उमर पठाण इत्यांदीसह मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.




