शहर

सफाळे – टेंभीखोडावे रस्त्यावरील मोरी तुटण्याच्या मार्गावर…. एल अँड टी कंपनीने जड वाहनांची वाहतूक अन्य मार्गाने करावी. टेंभीखोडावे ग्रामपंचायतीची कंपनीला सक्त ताकीद

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक -7030516640

बुलेट ट्रेन प्रकल्प उभारणीसाठी एल अँड टी कंपनी कडून केल्या जाणाऱ्या जड वाहनांच्या वाहतुकीमुळे पालघर जिल्ह्यातील टेंभीखोडावे रस्त्यावरील मोरी तुटण्याच्या मार्गावर असल्यामुळे या मार्गाने जड वाहनांची वाहतूक बंद करावी अन्यथा या भागातील नागरिकांचा शहराशी असलेला संपर्क तुटण्याचा दाट शक्यता आहे असा इशारा टेंभीखोडावे ग्रामपंचायतीने एल अँड टी कंपनीला पत्रकाद्वारे दिला आहे.

पालघर जिल्ह्यातील सफाळे टेंभीखोडावे हा रस्ता 9 किलोमीटरचा रस्ता असून टेंभीखोडावे हे गाव या रस्त्यावरील शेवटचे गाव आहे. या गावातील लोकसंख्या 5 ते 6 हजार आहे. या गावातील नागरिक या रस्त्याचा वापर करून रोज मुंबई,पालघर कडे येजा करत असून दळणवळण करण्यासाठी हा एकमेव रस्ता आहे. या रस्त्यावरील मोरी तुटण्याच्या मार्गावर असताना देखील या मोरीवरून बुलेट ट्रेनच्या प्रकल्प उभारणीसाठी एल अँड टी ही कंपनी या मोरी वरून जड सामानाने भरलेल्या वजनी वाहनांची वाहतूक करत असल्यामुळे ही मोरी मोडकळीस आली आहे. ही मोरी तुटल्यास या गावातील हजारो लोकांचा शहराची संपर्क तुटण्याची दाट शक्यता आहे.

कारण या गावातील लोकांना दुसरा पर्यायी मार्ग उपलब्ध नाही यामुळे या मोरीवरून एल अँड टी कंपनीने यापुढे जड वाहनांची वाहतूक करू नये असे पत्र या कंपनीला टेंभीखोडावे ग्रामपंचायत महिला सरपंच सौ.शोभा पाटील यांनी दिले असून जड वाहनांची वाहतूक करण्यासाठी या कंपनीने मोरीच्या बाजूने दुसरा रस्ता उपलब्ध करून वाहतूक करावी असा सल्ला देखील टेंभीखोडावे ग्रामपंचायतीचे उपसरपंच धणेश गावड यांनी एल अँड टी कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिला आहे..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button