महाराष्ट्र

भटक्या जोशी समाजातील अजय बनला पोलीस उपनिरीक्षक

उपसंपादक——– हुसेन मुलाणी टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. 97 30 867 448

दिस जातील दिस येतील… भोग सरल.. सुख येईल..
हे गाण ऐकताना एखाद रोपट घडत असताना ते रोपट वाढताना येणारा संघर्ष आठवतो .रोपट वाढत असताना रोपट्याची मुळ मातीत रुजून ती वाढत असताना ऊन ,वारा ,पाऊस हे वातावरण झेलत ते वाढत असत आणी एक दिवस सगळया वातावरणाशी भिडत ते रोपट झाडात रुपांतरीत होऊन पाना फुलांनी बहरलेल असत रोपट्याचा झाडात झालेला प्रवासच आज अजयच्या या अधिकारी पदाच्या प्रवासाची आठवण करून देतो
भटक्या विमुक्त जमातीतील जोशी समाजातील अजय भांडे या युवकाने पोलिस उपनिरीक्षकपदाला गवसणी घालून जोशी समाजासह समाजजीवनात एक नवा इतिहास घडवला आहे सोलापूर, पुणे विभागातील अकलूज, वकिलवस्ती भागातील पहिलाच व कमी वयाचा व पहिल्याच प्रयत्नात 2020 च्या परिक्षेच्या पहिल्याच प्रयत्नात पोलीस अधिकारी होण्याचा बहमान अजय ने प्राप्त केला आहे.

अजय चे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा वकिलवस्ती येथे तर माध्यमिक शिक्षण शिवाजी विद्यालय बावडा येथे पुर्ण केले .पुढे पदवीच्या शिक्षणासाठी भारती विद्यापीठ येथे कार्यरत असलेल्या विनायक भांडे या भावाच्या मार्गदर्शनाखाली पदवीच्या शिक्षणाबरोबरच स्पर्धा परिक्षेचा आभ्यास चालू ठेवला. वडील मिळेल ती मजूरी किंवा मिळेल ते काम करत असत तर आई शेत मजूरी करीत असे.इंदापूर तालुक्यातील वकिलवस्ती येथे जोशी समाजाची लोकवस्ती मोठ्या प्रमाणावर आहे पोटासाठी भटकंती तसेच मजूरी रोजंदारीवर जाणे पोटासाठी भटकंती करणार्या जोशी समाजात शिक्षणाच प्रमाण कमी आहे

कोणतीही शैक्षणिक सामाजिक पाश्वभूमी नसताना ईच्छाशक्ती च्या जोरावर व कुटूंबाच्या पाठिंब्यावर अजयने ही मजल मारली आहे.या बरोबरच 2021 च्या राज्य कर विक्री निरिक्षक पदी ही निवड झाली आहे तसेच समाधान न मानता राज्य सेवा मुख्य परिक्षा 2022 उत्तीर्ण होऊन मुलाखतीची तयारी करत पुढील परिक्षेचा आभ्यास , अविरत चालू आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button