शहर

बुलेट ट्रेन उभारणीसाठी भाडेतत्त्वावर घेतलेल्या सुपीक शेत जमिनीचे भाडे न मिळाल्यामुळे सफाळे चिखलपाडा येथील शेतकरी भयभीत

टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक -7030516640

मुंबई अहमदाबाद अति जलद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी पालघर जिल्ह्यातील सफाळे पश्चिम येथील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी बाधित झाल्या आहेत. या बाधित झालेल्या शेतकरी जमीन मालकांना सरकारने त्यांचा मोबदला दिला असला तरी हा प्रकल्प बनवण्यासाठी लागणारे कास्टिंग यार्ड 6 ते 7 वर्षासाठी टेंभीखोडावे जलसार या भागातील शेतकऱ्यांच्या 100 एकर खाजगी जमिनीवर उभारण्यात येणार आहे.

ही सर्व जमीन टेंभीखोडावे व जलसार या भागातील शेतकऱ्यांची असून प्रत्येकी 1 एकर जमिनीसाठी मासिक भाडे 20 ते 25 हजार रुपये या शेतकऱ्यांना देण्याचे आश्वासन बुलेट ट्रेन चे अधिकारी आणि एल अँड टी कंपनीने शेतकऱ्यांना दिले होते

परंतु या भागातील या शेतकऱ्यांना हे भाडे मंजूर नसल्यामुळे त्यांनी भाडे वाढवून द्यावे अशी अट बुलेट ट्रेनच्या अधिकाऱ्यांना सांगितल्यावर एल अँड टी कंपनीने कास्टिंग यार्ड साठी जागा न उपलब्ध झाल्यावर एल अँड टी कंपनीने चिखलपाडा येथील काही शेतकऱ्यांच्या सुपीक शेत जमिनीत या प्रकल्पाला लागणारे सिमेंट ब्लॉक लोखंडी वजनी सामान गेल्या 3 महिन्यापासून जमा करून ठेवले आहे.

याबाबत या शेतकऱ्यांना भाडे दिले जाईल असे आश्वासन देऊन 3 महिने होऊन देखील या शेतकऱ्यांना या जमिनीचे भाडे न मिळाल्यामुळे हे शेतकरी भयभीत झाले असून शासनाने याची दखल घेऊन आम्हाला आमच्या जमिनीचे भाडे लवकरात लवकर द्यावे यासाठी या भागातील शेतकरी पालघर जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्याकडे तक्रार दाखल करणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button